
प्रश्न ....??? ति.. सार्वजनिक स्वच्छता गृह काळाची गरज ..
(वार्ताहर - प्रिती जाधव) प्रश्न ....??? ति च्या रोजच्या जगण्यात ला.....( सार्वजनिक स्वच्छता गृह काळाची गरज ..)
खूपच जोराची आलीय ग... पण विचारायचं कोणाला आणि कसं ? ते ही लाजलज्जा आणि भीडभाड सोडून... पण करणार काय ? ही तर तिच्या जिव्हाळ्याची रोजच्या जगण्यातील एक समस्याच बनली आहे....
म्हणूनच ' राईट टू पी ' म्हणजे ' शू ' करण्याचा अधिकार...!! मागितला महानगरातल्या महिलांनी.. आज एकविसाव्या शतकात जिथे स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत तिथे हा अधिकार सहज म्हणून मिळत नाही तो मागवा लागतो निषेध करावा लागतो ही च खरी शोकांतिका आहे.. आजची स्त्री स्वतंत्र आहे अनेक उच्च पदांवर स्वार.. अगदी घरकाम करणाऱ्या तिच्या पासून मोठं मोठ्या पदांवर तिने स्वतः च निर्माण केलेलं अस्तित्व.. मग तिच्या कामाच्या वेळा घराबाहेर पडल्या वर कधी दहातास तर कधी बारा बारा तास... मग तिने घराबाहेर पडल्या वर लघवीला जायचं कसं कुठे ? महिलांच्या साठी कॉमन टॉयलेट नसणं ही खरंच खूप मोठी समस्या आहे... त्यासाठी मुंबई आणि इतर नगरांच्या मध्ये ही महिलांनी जाहीर निषेध नोंदवला.. घराबाहेर पडल्या वर स्वच्छ आणि सहज टॉयलेट उपलब्ध असणे हा स्त्रियांचा अधिकारच आहे..कित्ती साधी आणि योग्य मागणी ..!!
स्वच्छ भारत ह्या संकल्पने कडे पाहताना हा विषयही गांभीर्याने घ्यायला नको का ?
बाहेर पडल्यावर उघड्यावर बसणे शक्य नाही.. एकेकिंनी तर लघवी साठवून धरायची सवयच लावून घेतली आहे ..पण ह्या कोंडमाऱ्यामुळे कित्ती शारीरिक दुष्परिणामांना स्त्रियांना सामोरे जावं लागत.. ह्याचा विचार कोण करणार ? युरीन इन्फेक्शन, पोटात दुखणे, हसलं खोकल की कपड्यात शू होणं त्या मुळे संडासचही चक्र बिघडण.. एक ना अनेक इन्फेक्शन... हे दुष्परिणाम टाळण्यासाठी महिलांनी दोन तीन तासांनी बाथरूमला जाणं आवश्यक आहे.. पण स्वच्छतागृहांच्या अभावी महिला हे टाळतात... काही ठिकाणी स्वच्छ्ता गृह असून ती अस्वच्छ असल्याने जाणं टाळलं जातं.. महिलांना आपला कार्यभाग पुरुषांच्या सारखा उघड्यावर उरकता येत नाही.. पण लघवी तुंबवून ठेवल्याने जंतूंची लागण होते.. खरंतर इन्फेक्शन हे अस्वच्छ ठिकाणी लघवी केल्याने नाही तर बराच वेळ लघवी तुंबवून ठेवल्याने होते.. अशावेळी स्वच्छ्तागृह स्वच्छ अस्वच्छ आहे हे पाहण्यापेक्षा जंतू बाहेर जाणं जास्त महत्वाचं होत.. तुंबलेले बाहेर पडले की कित्ती अगदी आत्मिक सुख मिळाल्याचे समाधान मिळते...नाहीतर जीवाची नुसती घालमेल...
पण आपल्या देशात इतक्या प्राथमिक, साध्या, नेहेमीच्या गरजेच्या गोष्टींसाठी सुद्धा मागणी करावी लागते आणि निषेध नोंदवावा लागतो ही गोष्टच अस्वस्थ करणारी आहे ...सगळी कडे बोभाटा झाल्यावर तरी स्त्रियांना त्यांचं हक्काचं स्वच्छ्तागृह मिळणार का, ही कुचंबणा थांबणार का हेच पाहावे लागेल..मैत्रिणींनो, आपलं शरीर हे एक मंदिर आहे ग .. ते निरोगी ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया ...हा वसाच घेऊयात...