
रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत !!
कुपोषण प्रशनी उच्च न्यायालयाने रुग्णालयातील सर्वच जागा भराव्या अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे मा पंतप्रधानांनी ७५ हजार नियुक्त्या दिल्या. तरी कुपोषणग्रस्त, आदिवासी विभागातील रुग्णालयातील सर्वच प्रकारच्या नियुक्त्या होणे. त्याचबरोबर राज्याच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात असलेल्या सरकारी, महानगर पालिका रुग्णालय मध्ये, बाह्यरुग्ण कक्षा पासून (के इ एम सारख्या नेत्र विभागामध्ये दिवसाला २०० नेत्र उपचारासाठी बाह्यरुग्ण (ओ पी डी) येत असून, नेत्र तपासणी उपकरणे असूनही तेथे डॉ नसल्यामुळे २,३ तास रुग्णाला ताटकळत बसावे लागते.) शस्त्रक्रिया गृहापर्यंत, डॉ, तज्ञ, परिचारिका, कर्मचारी ई रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. त्यामूळे अधून मधून निरनिराळ्या साथीच्या रोगावर योग्य उपचार होऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळू शकेल.