A B फॉर्म आणि निवडणूक अयोग्य !!

A B फॉर्म आणि निवडणूक अयोग्य !!

     महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सर्वोचं न्यायालयात पोचला असून शिवसेनेचा फुटीर गटाने शिवसेना आमची म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच्या विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्याविरुद्ध याचिका दाखल केली असून, त्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवावे अशी याचिका सादर केली आहे. त्याविषयी न्यायालयाने धनुष्यबाण चिन्हा संबंधीचा निर्णय निवडणूक आयोगाकडे आहे, असा निर्णय दिला आहे. तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिये मध्ये कोणाही उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरतेवेळी पक्षातर्फे A B फॉर्म द्यावा लागतो. याला अत्यंत महत्व असून संबंधित उमेदवार हा त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो. त्यामुळे त्याला त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळते. त्या फॉर्म वर उमेदवाराचे नाव, कोणत्या मतदारसंघातून अधिकृत उमेदवार आहे, इ माहिती द्यावी लागते. त्यामुळे पक्षाचे चिन्ह देण्याचा, उमेदवार ठरवण्याचा, उमेदवार निवडून आण्याची हमी, पक्षाच्या अध्यक्षाची असते. शिंदे गटातील विधानसभा, लोकसभा, आमदार, खासदार A B फॉर्म च्या चिन्हांवरून निवडून आले आहेत. त्यामुळे A B फॉर्म ला अत्यंत महत्व असून, निवडणूक प्रक्रियेत, आयोगाचा कायदेशीर तरतुदीचा भाग आहे. असे असताना, शिंदे गटाने संख्याबळावर भाजप बरोबर सत्ता स्थापन करून पक्षांतर बंदी कायदा, आणि संपूर्ण पक्षाला, पक्ष चिन्हाला आव्हान दिलं आहे. तरी आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सत्ता संघर्षा मध्ये, सत्ताधाऱ्यांना रोखण्याकरीता (उध्दव ठाकरेंच्या शिवसेना गटातील वकिलांनी A B फॉर्म संबंधी निवडणूक आयुक्त यांना निदर्शनात आणावे)"राम  शाश्त्री" बाण्याने लोकशाही रक्षण करीता योग्य न्याय देणे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम