
शिवसेना मेळावा, प्रथा परंपरा चालू राहावी !!
शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्ट १९६६ ला शिवाजी पार्क येथे झाल्यानंतर प्रत्येक दसऱ्याला एक मैदान, एक वक्ता, मागील ५६ वर्षे होत असताना, २ वेळा पाऊसामुळे, २ वेळा करोनामुळे रद्द झाला. बाळासाहेबांच्या मृत्यू नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मागील ११ वर्षे त्याच जोमाने आणि अलोट गर्दीत मेळावे घेतले आहेत. तरी या मेळाव्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकदा तरी दसरा मेळाव्याला भाषण केले आहे का ? शिंदे गट आणि भाजपने संख्या बळावर सत्ता स्थापन केली.
त्याचप्रमाणे न्यायालयाच्या प्रलंबित निर्णयामुळे खऱ्या शिवसेनेचा निर्णय लागत नसला तरी, शिवसेनेचा दसरा मेळाव्याला परवानगी देण्याची महापालिकेने प्रलंबित ठेवली आहे. परंतु शिवाजी पार्क सभेसाठी देणे संबंधी काढलेल्या आदेशात दसऱ्याचा उल्लेख असल्यामुळे तांत्रिक, कायदेशीर कोणतीही अडचण नाही. तरी शिंदे गट आणि भाजपनी नतदष्टपणा दाखवू नये. शिवाजी पार्क दसरा मेळावा ही सेनेची प्रथा, परंपरा आहे. त्याचप्रमाणे कोणाची खरी शिवसेना आणि शिवसेनेचा करिष्माही समजू शकेल.