गणेश भक्तांना रेल्वे उद्घोषणा !!
सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना, लालबाग, परळ, डिलाई रोड इ परिसरात गणेशोत्सव पाहण्यासाठी लाखो भक्त येत असतात. (तत्पूर्वी लोअर परळ उड्डाणपूल मागील काही वर्षांपासून बंद असून, त्याच्या पुनर्वसनेचे काम रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांना गणेश भक्तांना गैरसोईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासंबंधी नुकत्याच विधान परिषदेत आमदार सुनील शिंदे यांनी संबांधित उपाय योजना कराव्या अशी सूचना केली आहे.
दादर, परळ, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा आणि प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी इ रेल्वे स्थानकांवरून येणाऱ्या भक्तजनांना स्थानक बाहेर पडण्यापूर्वी कोणत्या गणपतीला जायचे आहे, कुठून रांग लावायची आहे या विषयी गोंधळ असतो. त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा करण्यात यावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सव संघटना, रेल्वेशी समन्वय साधून योग्य सूचना दिल्यास गणेश दर्शनासाठी गोंधळ उडणार नाही.