
सगळे काही जनतेने करावयाचे !!
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षात हर घर तिरंगा, ही मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेच सर्वत्र तीन दिवस तिरंगा झेंडा उत्साहाने फडकवण्यात आला. तरी १५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी लालकिल्यावरून भाषण करताना गेले ८ वर्षात दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण केली, काळेधन, भ्रष्टाचार, नोकऱ्या, महागाई अशा विषयावर एक शब्द नाही. परंतु सब का साथ, सब का विश्वास हे जुने शब्द नव्याने उच्चारुन, आता सबका विश्वास, सबका प्रयास म्हणजे प्रत्येकानी आपले नागरीक कर्तव्य बजावले, तर आपले उद्दिष्ट प्राप्त होईल. म्हणजेच सगळे काही जनतेने करायचे काय ?