मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे मुंबई पत्र/लेख स्पर्धेचे आवाहन !!

मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे मुंबई पत्र/लेख स्पर्धेचे आवाहन !!

      सध्या महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या इतक्या धक्कादायक आणि अकल्पनिय असतील असे कुणाही मराठी माणसाला वाटले नव्हते, अजूनही हा सत्ता संघर्ष थांबला नाही, याउलट त्याचा शेवट काय असेल याचेही आडाखे बांधता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. या उद्भवलेल्या २०जून पासूनच्या सत्तानाट्या संदर्भाने वृत्तपत्र लेखकाने आपले परखड मत निरक्षिर भूमिका घेत निर्भीडपणे वर्तमानपत्रातून मांडले आहे. 

      या अनुषंगाने सर्व वृत्तपत्र लेखकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, सद्य परिस्थितीवर ज्यांचे पत्र वा लेख वर्तमानपत्रातून छापून आले असेल त्यांच्यासाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुकांनी आगाऊ नोंदणीसाठी पत्र वा लेखाचा एक फोटो काढून राजन देसाई (8779983390) यांच्या व्हाट्सअप वर अगोदर पाठवावी, तसेच त्याचीच झेरॉक्स प्रत शुक्रवार, दि. २९ जुलैच्या कार्यक्रमाप्रसंगी घेऊन यावे.

      कार्यक्रमात त्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर दोन (२) रोख पारितोषिक देण्यात येतील असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर करीत आहेत.

      मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि आचार्य अत्रे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 'कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र !' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि चित्रलेखाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि सुप्रसिद्ध वक्ते ज्ञानेश महाराव आपले विचार मांडणार आहेत. तर राजेंद्र पै हे आपले आजोबा 'आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र' या विषयावर बोलणार आहेत. शुक्रवार, दि. २९ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ६ .३० वा धुरु हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर - पश्चिम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week