
राज्यसभा निवडणूक, न्यायालय बहिरी झाली आहे का ?
राज्यसभा निवडणूक मध्ये ६ खासदारांची निवड करायची होती. परंतु भाजप ने आपला एक उमेदवार उभा केल्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. त्यात २ आमदार तुरुंगात असल्यामुळे न्यायालयाने त्यांना मतदानाची परवानगी नाकारली.
तत्पूर्वी छगन भुजबळ आणि पप्पू कलानी यांनाही आमदार असताना अटक झाली होती. परंतु त्यावेळी न्यायालयाने त्यांना मतदानासाठी परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनाही परवानगी मिळायची. लोकशाही मध्ये मतदान हे मतदारांचा हक्क आहे. तरी अशा परिस्थितीत न्यायालय बहीरी झाली आहे का ?