मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून हॉकर्स फेरीवाले यांच्या करिता निर्बंध लागू !!

मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून हॉकर्स फेरीवाले यांच्या करिता निर्बंध लागू !!

     दिनांक १५ मार्च २२ रोजी मा.पोलीस आयुक्तलया मध्ये बृहन्मुंबईतील सर्व सामान्य नागरिक यांचे कडुन हॉकर्स आणि बेघर यांच्याबाबत प्राप्त होणाऱ्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीस मा.पोलीस सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था, बृहन्मुंबई सर्व प्रादेशिक विभाग आणि वाहतूक विभागाचे मा.अपर पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ यांच्यासह, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी श्रीमती चंदा जाधव, विविध हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी, लोकल विभाग मॅनेजमेंट यांचे प्रतिनिधी, समाज सेवी संघटनांचे प्रतिनिधी, समाज सेवा संस्थांचे पदाधिकारी, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, बेघर लोकांसाठी काम करणाऱ्या शासकीय/समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी असे एकूण ६० जण उपस्थित होते.

           सदर वेळी सर्व पदाधिकारी यांच्याशी पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका विभाग यांनी चर्चा करून संयुक्त सर्वसामान्य नागरिकांना फुटपाथ आणि रस्त्यावर असलेल्या हॉकर्स मुळे तेथून चालताना कोणताही त्रास होणार नाही, रस्त्यालगत हॉकर्स मुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, या अनुषंगाने योग्य ती उपाय योजना करण्याबाबत मा.पोलीस आयुक्तांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या.     

     १. बृहन्मुंबई महानगर पालिका यांनी मुंबईतील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सच्या अनुषंगाने टी आणि शर्थी नमूद असलेल्या कायद्याचा मसुदा शासनाकडे सादर केला असून सदरचा कायदा लवकरात लवकर संमत करून अंमलात आणण्यासाठी मा. आयुक्त प्रयत्न करीत आहेत. तोपर्यंत  सर्वोच्च न्यायालय आणि मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे.

    २. मुंबईत फुटपाथवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडुन आखून दिलेल्या मर्यादित जागेमध्येच हॉकर्सने व्यवसाय करणे आवश्यक आहे.

   ३. बृहन्मुंबई महापालिकेच्या नियमानुसार रेल्वे स्थानक, ओव्हर ब्रिज आणि त्याच्या खाली रुग्णालय व त्याचा परिसर इत्यादी ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

  ४. रेल्वे स्थानका बाहेर १०० मीटर परिसरातील "नो हॉकिंग झोन" हॉकर्स यांनी व्यवसाय करू नये.

        हॉकर्स हे निमुळत्या रस्त्यालगत दोन्ही बाजूला व्यवसाय करतात. त्यामुळे नागरीकांना चालायला त्रास होत असतो. त्याबाबत पदाधिकारी यांनी विचार विनिमय करुन पर्यायी मार्ग शोधावा.

 ५. रस्त्यावरील परवाना धारक दुकानदार हे त्यांच्या दुकाना समोरची जागा भाडयाने देतात. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो. याबाबत योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.

 ६. फुटपाथ वर चालताना होणारी गर्दी त्यामुळे रस्त्यावरून चालावे लागते, त्यामुळे चेन स्नेचिंग च्या गुन्ह्यात वाढ होताना दिसते. या बाबत दुकानदार हॉकर्स यांनी खबरदारी घेतली पाहिजे.

        हॉकर्स आणि दुकानदार यांना पोलीस दलाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल परंतू नियमांचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आयुक्तालयाकडुन सांगण्यात आले आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week