कर्तृत्ववान पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार !

कर्तृत्ववान पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार !

      दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई बंदर परिमंडळ अंतर्गत संवेदनशील व यशस्वी       कामगिरी केलेल्या पोलीस अंमलदार व अधिकारी यांचा दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मा. श्री. विश्वास नांगरे पाटील पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई यांच्या हस्ते प्रेरणा सभागृह पोलीस उप आयुक्त बंदर परीमंडळ, कार्यालय येथे पोलीस अधिकारी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. ह्यात दक्षिण प्रादेशिक विभाग मुंबई अंतर्गत मुंबई सागरी १ पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष कोकरे, शिवडी पोलीस ठाणे मधील पोलीस निरीक्षक श्री विनायक भिलारे, श्री संतोष नाटकर, वडाळा पोलीस ठाणे येथील पोलीस उप निरीक्षक श्री अरविंद मसलकर, यलो गेट पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुनील कर्पे, मुंबई सागरी पोलीस ठाणे येथील पोलीस शिपाई यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्धल त्यांना विशेष पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे. कार्यक्रमाच्या वेळी मा.दिलीप सावंत अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग , मा श्रीमती गीता चव्हाण पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ यांच्या उपस्थितीत पार पडला.

             तसेच भोईवाडा पोलीस ठाणे, अँटोप हिल पोलीस ठाणे, कुरार पोलीस ठाणे, बोरिवली पोलीस ठाणे, मालवणी पोलीस ठाणे येथील अंमलदार व अधिकारी यांनी केलेल्या चांगल्या कामगिरी बद्धल मा. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

             


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week