
जलद प्रतिसाद पथक यांची उल्लेखनीय अभिमानास्पद कामगिरी !
जलद प्रतिसाद पथक यांची उल्लेखनीय अभिमानास्पद कामगिरी !
श्री विश्वास नांगरे पाटील पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई यांच्या हस्ते गुणगौरव !!
दिनांक १० फेब्रुवारी रोजी क्रीडा केंद्र कलीना मैदान मुंबई येथे जलद प्रतिसाद मुंबई यांचे अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी बद्धल जलद प्रदिसाद पोलीस उप आयुक्त याच्या अंतर्गत पोलीस अंमलदार यांचा विशेष परितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. गुण गौरवाचे मानकरी अंमलदार श्री विशाल गायकवाड, अंमलदार श्री सुरज बाबर, अंमलदार समाधान कांबळे, अंमलदार श्री राहुल सकपाळ, अंमलदार कृष्णा अनुसे हे आहेत.
पोलीस शिपाई १) श्री विशाल सदाशिव गायकवाड यांनी महाराष्ट्र् पोलीस शूटिंग स्पर्धा २०१७ मध्ये ४ सुवर्ण पदक, ५ रौप्य, आणि ४ कांस्य पदके पटकावली.
२) पोलीस शिपाई श्री सूरज अरविंद बाबर यांनी अखिल भारतीय कमांडो स्पर्धा २०१६ मध्ये महाराष्ट्र् संघात सहभाग करून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
३) पोलीस शिपाई समाधान शाहूराज कांबळे यांनी अखिल भारतीय कमांडो स्पर्धा २०१८ मध्ये महाराष्ट्र संघातून मनेसर हरियाणा येथे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
४) पोलीस शिपाई राहुल राजेंद्र सकपाळ यांनी फोर्स वन तर्फे आयोजित प्रशिक्षण मध्ये यश संपादन करून एकूण सुवर्ण पदके, जी सी पी सी बेस्ट कमांडो इन पी पी ई टी, बेस्ट कमांडो इन २० किमी स्पीड मार्च, एसी. पी. सी. बेस्ट कमांडो इन पी. पी. टी. बेस्ट कमांडो इन बी. पी. ई.टी. म्हणून चांगली कामगिरी केली.
५) पोलीस शिपाई समाधान कांबळे यांनी अखिल भारतीय कमांडो स्पर्धा १२०१९ महाराष्ट्र संघातून निवड स्थळ पुणे महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
सदर कार्यक्रम श्री डी. एस स्वामी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ८ मुंबई, श्री श्याम भीमराव घुगे पोलीस उप आयुक्त जलद प्रतिसाद यांच्या उपस्थितीत पार पडला.