
सहार पोलीस ठाण्याने केली अभिमानास्पद कामगिरी !
पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई अंतर्गत परिमंडळ ८ मध्ये सहार पोलीस ठाण्यातील पोलीस नामदार श्री दिगंबर काळे यांनी अति महत्वाच्या व्यक्तींचे आगमन/नीर्गमन लेले वाडी व चिपटपाडा मिश्र वस्ती कार्गो विमानतळ येथे गोपीनिय माहिती काढुन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त व चांगली कामगिरी केली आहे.
श्री दिगंबर काळे यांनी केलेल्या प्रशंसनीय व उत्तम कामगिरी बद्धल दिनांक १ जानेवारी रोजी पसायदान हॉल बि.के.सी पोलीस ठाणे मुंबई येथे श्री विश्वास नांगरे पाटील पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई येथे पोलीस उपआयुक्त परिमंडळ ८ यांच्या हस्ते पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा विशेष पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमच्या वेळी श्री. संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई, डॉ श्री. डी एस. स्वामी, पोलीस उपायुक्त परिमंडळ ८ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला.
असे श्री.संजय लाटकर, पोलीस उपायुक्त (अभियान), जनसंपर्क अधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.