
मुंबई वाहतूक पोलिसांचा एक दिशा मार्ग आदेश जारी !!
कार्यकारी अभियंता मुंबई यांच्या मार्फत वरळी गाव व पोस्ट कार्यालय, वीर नरीमन मार्ग वरळी ते बाबा साहेब वरळीकर चौक दरम्यान पर्जन्य जलवाहिनीचे काम करून सदरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सदरच्या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सदरचा मार्ग एकदिशा करण्याचे ठरविले आहे.
वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, तसेच वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आणि सर्व सामान्य जनतेची होणारी गैर सोय टाळण्यासाठी श्री. राजतिलक रौशन (भापोसे) पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य) वाहतूक मुंबई यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ यांचे कलम ११५ या द्वारे वाहतुकीचे खालील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
दिनांक १/२/२०२२ सकाळी ६ वाजल्या पासून दिनांक १९/२/२०२२ चे २४ वाजेपर्यंत अंमलात राहतील.
एक दिशा मार्ग आदेश
वरळी गाव पोस्ट कार्यालय वीर नरिमन मार्ग वरळी कोळीवाडा ते बाबा साहेब वरळीकर चौक दरम्यानची वाहतूक एक दिशा राहील. तसेच बाबासाहेब वरळीकर चौक ते वरळी गाव पोस्ट कार्यालय वीर नरिमन मार्ग वरळी कोळीवाडा कडे जाणारी वाहतूक ही डॉ अँनी बेझंट मार्गे सासमिरा जंक्शन येथे उजवे वळण घेऊन बी.सी. कांबळे चौक (हर्डीकर जंक्शन) येथे डावे वळण घेऊन हर्डीकर मार्गाच्या दक्षिण वाहिनीने जे. के. कपूर चौक येथे उजवे वळण घेऊन वरळी वीर नरिमन मार्गे वळविण्यात आली आहे.
अशी माहिती श्री. राजतिलक रौशन (भापोसे) पोलीस उप आयुक्त मुख्यालय व मध्य विभाग वाहतूक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटली आहे.