राज्यस्तरीय "अष्टाक्षरी" काव्यप्रकारात "सामाजिक कार्याची जाण" या विषयावर महास्पर्धा !!

राज्यस्तरीय "अष्टाक्षरी" काव्यप्रकारात "सामाजिक कार्याची जाण" या विषयावर महास्पर्धा !!

          २६ नोंहेबर २०२१ रोजी दर्दी नंदेय साहित्य समूह मुंबई आणि सावित्री ब्रिगेड नागपूर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय सन्मानीय महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध, ख्यातनाम सामाजिक प्रबोधनकार, अष्टपैलू सूजनशील व्यक्तिमत्त्व असलेल्या जेष्ठ लेखिका / कवयत्री प्राचार्या डॉ. स्मिताताई मेहेत्रे (नागपूर) यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही साहित्य समूह मिळून खुली राज्यस्तरीय "अष्टाक्षरी" काव्यप्रकारात "सामाजिक कार्याची जाण" या विषयावर महास्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेचा निकाल दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर झाला. राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत रोख "सर्वोकृष्ठ" पारितोषिक- नवी मुंबईच्या प्रसिद्ध कवयत्री सौ. सुचित्रा कुंचमवार यांनी पटकावले तसेच "उत्कृष्ट" पारितोषिक नागपूर शहराचे ख्यातनाम कवी लीलाधर दवंडे यांनी मिळवले आणि "प्रथम" पारितोषिक, नांदेडच्या किनवट तालुक्यातील प्रसिद्ध कवयत्री अर्चना गरुड यांनी मिळवले "दृतीय" पारितोषिक, कवी परमानंद जेगठे "तृतीय" पारितोषिक, कवयत्री भारती सावंत व "उत्तेजनार्थ" पारितोषिक म्हणून कवयत्री निशा कापडे यांनी पटकवले. 

      या स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून दीडशे स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होऊन रचना सादर केल्या अत्यंत भरघोस प्रतिसाद देवून चुरशीची स्पर्धा झाली. औरंगाबाद शहराच्या सुप्रसिद्ध कवयत्री सौ. सुनीता कपाळे यांनी निःस्वार्थ परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक म्हणून आदरणीय प्रगतीताई मानकर अध्यक्ष- संभाजी ब्रिगेड नागपूर महाराष्ट्र, दर्दी नंदेय साहित्य समूह मुंबई समूह प्रमुख- (कविनंदेय) महेश भामरे, समूह संचालक / उत्कृष्ट संकलक म्हणून आदरणीय कु. शिल्पाताई वाहाणे, कवयीत्री सौ. प्रतिभाताई केदार-पवार, कवयीत्री सौ. किर्तीबाई बोरकर, समूहाच्या सुप्रसिद्ध संचालिका / प्रसिद्धी प्रमुख असलेल्या आदरणीय कवयत्री सौ. प्रीतीजी तिवारी, वसई आणि या स्पर्धेकरिता उत्कृष्ट, सुबक प्रमाणपत्र बनवून दिले अश्या ख्यातनाम सुप्रसिद्ध ग्राफिक्सकार कवयत्री सौ. प्रणालीताई म्हात्रें (विक्रोळी) यांनी काम पाहिले. दोन्ही समूहातील संचालक वर्गाचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेत भाग्य घेतलेल्या सर्व स्पर्धकांना समूहात राज्यस्तरीय स्पर्धेचे सहभाग प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आले. स्पर्धेत देश विदेशातील व गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यातील साहित्यिकांनी उत्फुर्स भाग घेवुन आपल्या काव्यात्मक लेखणीचा ठसा उमटविला. साहित्य सेवा व प्रबोधन हे झाले पाहिजे हाच समूहाचा मुख्य उद्देश आहे असे समूह प्रमुखांनी व्यक्त केले.

       या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजक म्हणून दर्दी नंदेय साहित्य समूह मुंबई, सावित्री ब्रिगेड नागपूर महाराष्ट्र, जागर स्त्रीशक्तीचा (महा.) यांनी काम पाहिले.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week