
मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय गुन्हे विभागाला वाखाणण्याजोग यश ! अवैध अग्निशस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमास बड्या शिताफीने अटक !!
मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय गुन्हे विभागाला वाखाणण्याजोग यश ! अवैध अग्निशस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमास बड्या शिताफीने अटक !!
अवैध अग्निशस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमास नयानगर पोलीस ठाण्याने बड्या शिताफीने अटक केली. दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना गुप्त बातममीदाराकडून बातमी मिळली की मध्यप्रदेश येथे राहणारा एक इसम, पूनमसागर रोड, परिवार हॉटेल समोर, मिरारोड पूर्व येथे अवैध अग्नीशस्त्र विक्रीसाठी आणणार आहे.
सदर बाबतीत मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ यांना सदरच्या बातमी बद्दल माहिती देण्यात आली होती. मा. उप आयुक्त, यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शना खाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणय काटे व पोलीस पथकाने सापळा रचला व दबा धरून बसले. दिलेल्या ठिकाणी नरेश मोहन देशमुख वय वर्ष ३८ हा संशयित इसम राहणार हनुमान मंदिर, तलाव जवळ कटंकी, तालुका, जिल्हा, बालाघाट, मध्यप्रदेश यास ताब्यात घेतले. सदर इसमाकडे प्राथमिक विचारपूस केली असता तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. नंतर त्यांनी पंचांच्या समोर नरेश देशमुख याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ पाच देशी बनावटीची पिस्टल, पाच मॅक्झीन व आठ जिवंत काडतुसे सापडली.
त्याबाबत आरोपी नरेश मोहन देशमुख वय ३८ वर्ष याच्या विरुद्ध नयानगर पोलीस ठाणे येथे, गुन्हा रजि क्र. ७१९, भा.ह.का कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधीनियम १९५१ चे कलम ३७(१), ३७(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून मा. न्यायालयाने आरोपीला दिनांक ७ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे.
सदर गुन्ह्याचे पुढील तपासा दरम्यान नयानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीकडून प्राप्त माहितीच्या आधारे ए.बी.रोड, डेबन नदी थान, जुलसानिया, जि बडवानी, मध्यप्रदेश येथून तीन देशी बनावटीचे पिस्टल, तीन मँक्झिन व सहा जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. अश्या प्रकारे आरोपी नरेश मोहन देशमुख याच्या कडून आठ गावठी पिस्टल, आठ मँग्झीन व १४ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. जिलानी सय्यद हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त श्री. अमित काळे, परिमंडळ १, श्री. शशिकांत भोसले सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, प्रभारी अधिकारी नयानगर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली नयानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणय काटे, पोलीस उप निरीक्षक आशुतोष चव्हाण, पोलीस हवालदार पाटील, पोलीस नामदार पठाण, पोलीस नामदार संधू , पोलीस नामदार गुरव, पोलीस शिपाई मुलानी, पोलीस शिपाई खामगळ, पोलीस शिपाई केंद्रे यांनी कुशलरीत्या, कौतुकास्पद पार केली.