
दिनांक 22 मे रोजी आ.ऍड.आशिष शेलार, आ मनीषा चौधरी यांचा मच्छिमार सेलच्या वतीने मुंबई दौरा !!
दिनांक 22 मे रोजी आ.ऍड.आशिष शेलार, आ मनीषा चौधरी यांचा मच्छिमार सेलच्या वतीने मुंबई दौरा !!
दि.१५ मे रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे मुंबई सहित समुद्र किनारी राहत असलेल्या मच्छिमार बांधवांचे खूप मोठे अतोनात नुकसान झाले. चक्री वादळात समुद्रात अडकलेल्या जहाजांवरील बऱ्याच खलाश्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही खलाशी अजुनही सागरात बेपत्ता झाले आहेत. या सर्व दुर्दैवी घटना लक्षात घेता भाजपा मुंबई मच्छिमार सेलच्या वतीने आमदार आशिष शेलार व आमदार मनीषा चौधरी यांनी मुंबई किनाऱ्याचा दौरा केला. यात मुंबई मच्छिमार बांधवांची नुकसान भरपाईची बाब शासना समोर मांडण्यात आली. तसेच भाजपा कडून मच्छिमारांना मदतीचा हात पुढे करणार असल्याचे सांगितले. तरी आपल्या मच्छिमार बांधवांनी आपल्या मच्छिमार बोट मालकांची माहिती तयार ठेवावी असे आवाहन मुंबई भाजपा मच्छिमार सेलच्या वतीने करण्यात आले. ह्या वेळेस मच्छिमार कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. पुढील प्रमाणे मुंबई सागरी किनाऱ्याचे दौरे करण्यात आले वेळ सकाळी १० वाजता कुलाबा जेटी, स ११ वाजता वरळी जेटी, ११.३० माहीम, १२.३० वर्सोवा, १.३० मढ असे श्री भाग्येश भाये उपाध्यक्ष भाजपा मच्छिमार सेल मुंबई यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.