जलतरणपटू श्रावणी जाधव हिची कोरोना योद्धास अनोखी मानवंदना.....

जलतरणपटू श्रावणी जाधव हिची कोरोना योद्धास अनोखी मानवंदना.....

           कोरोना काळात कोरोना योध्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या  अनमोल कार्याचा सन्मान करण्यासाठी कल्याण मधील ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू कु.श्रावणी संतोष जाधव वय वर्ष १४ हिने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किमी सागरी अंतर पार करून एका अनोख्या पद्धतीने कोरोना योध्यांना सलामी दिली. कोरोना काळात डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय, स्मशानभूमीतील कर्मचारी, सफाई कामगार, शासकीयसेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक शब्दात करता न येण्यासारखे आहे. ते करण्यासाठी श्रावणीने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किमी सागरी अंतर पार करून कोरोना योध्यांना मानवंदना दिली.


        तिच्या या धाडसी कामगिरी बद्दल शिवसेने तर्फे मुंबईच्या माजी महापौर तसेच वार्ड क्रमांक १९८ च्या नगरसेविका राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा स्नेहलताई आंबेकर व स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी श्रावणी जाधव हिचे अभिनंदन केले. अभिनंदन करताना स्नेहल आंबेकर म्हणाल्या की मराठीत म्हण आहे 'मूर्ती लहान कीर्ती महान' त्याच प्रमाणे  श्रवणीआहे. इतक्या लहान वयात इतके मोठे अंतर पार करून तिने अतिशय धाडसी कामगिरी केली आहे, कोणतेही काम पाठबळा शिवाय पूर्ण होत नाही. श्रावणी  च्या आई वडिलांनी तिला मनो धेर्य दिले. तिला पाठबळ दिले म्हणून आज ती १४ किमी सागरी अंतर पार करू शकली. असे बोलून तिच्या आई वडिलांचे ही कौतुक केले.

      लवकरच श्रावणाची भेट मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याबरोबर घालून देऊन सत्कार करण्यात येईल असे स्नेहल आंबेकर म्हणाल्या व तिच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. म.उप.विभाग संघटक बिना दौडकर, शाखा प्रमुख जयवंत नाईक, शाखा संघटक सुरेखा हाडोळे व उपशाखा प्रमुख श्री ओमकार चव्हाण  ह्या वेळेस उपस्थित होते. तसेच स्वीमिंग असोशियन ऑफ महाराष्ट्र तर्फे  तिला शुभेच्छा देण्यात आल्या.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week