
कांदा महाग नाही लोकांचे विचार स्वस्त झालेत.
फुकट खाणारी जनता किती दिवस 5 अन 10 रुपये किलो ने शेतकऱ्यांचे माल खातील?
सर्वांनी 100 रुपये नी कांदा खायची तयारी करायला हवी . आठवड्याला एक किलो महिन्याचे फक्त चार किलो कांदा . 400 रुपये खर्च करायला काय जाते ? पण लोकांना हॉटेल मध्ये जेवायला , पॉपकॉर्न खायला , ओला उबर ने फिरायला , ब्रँडेड कपडे शूज गॉगल घालायला , चित्रपट पाहायला पैसा आहे. ब्युटी पार्लर ला जायला पैसे आहेत पण कांदा च फुकट पाहिजे.
Mentality बदलली पाहिजे.
शेतकरी अश्या फुकट खाऊ प्रवृत्ती मुळे मरतो आहे.
आपण लहान असताना पाच रुपये ला मिळणारे साबण आत्ता ऐशी रुपये ला भेटू लागले पण कोणी त्यावर व्हिडिओ नाही बनवला? सगळे मिळून मारत आहेत शेतकऱ्याला .
त्याला पण जगू द्या.
कधी बसून खर्च मांडा , बघा पूर्ण पगारातील आपण किती टक्के खर्च करतो शेतमाल खरेदीवर?
उत्तर असेल फक्त पाच टक्के! म्हणजे आपल्याला शेतमाल नसून इतर वस्तू जीवनावश्यक झाल्या आहेत.
आत्ता शेतमाल जीवनावश्यक मधून काढायला हवा. जनतेला परवडले तर खा नाहीतर ब्रँडेड कपडे आणि जपून ठेवलेली सेविंग अन महागाई भत्ता खा.