
वार्तांकन विश्वासहार्य असावे !
लोकशाहीच्या चार स्तंभ पैकी वृत्तपत्र मिडीया एक आहे. परंतु आजकाल कोणीही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी सुरू करू शकतो. अशा वृत्तपत्र मध्ये माध्यमांना चमचेगिरी करणारे संपादक पत्रकार निर्माते लागतात. मालक सांगणार तेच लिहिणार प्रसारित करणार असे पत्रकार स्वतःला महान विचारवंत म्हणविणार आणि राजकीय नेत्यांना समाज कार्यकर्त्यांना विचारवंतांना चर्चात्मक कार्यक्रमात जणू काही राजकारण-समाजकारण राज्यकारभार करीत असतात. असे कार्यक्रम घेणार तेच तज्ञ विचारवंत, प्रवक्ते एखाद्या घडामोडीवर चर्चा करणार, एका चित्रपट अभिनेत्याची आत्महत्या, एका अभिनेत्रीची पोलिसांबद्दल अविश्वास दाखविणे अशा सेलिब्रिटीस च्या बातम्या किती दिवस दाखवणार. ह्या बातम्या मिळवण्यासाठी वाहिन्यांच्या वार्ताहरांच्या मारामाऱ्या होत आहेत. अशांकडून निपक्षपाती पत्रकारितेचे अपेक्षा करणार याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणणार काय? इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम फास्ट आहे हे मान्य केले तरी आज प्रत्येक वाहिनी आपला टीआरपी वाढवण्यासाठी सवंग बातम्या प्रसारित करणार. एखाद्या बातमीचे घटनेचे चित्रण कितीवेळ दिवस-रात्र ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवायच, सध्या पूर्वग्रहदूषित दिसून येत असून ही नीतिमूल्यांची घसरण आहे, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे का असा प्रश्न पडतो. त्यामुळे न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी जनहित याचिका करावी लागत आहे.
शिवसेनाप्रमुख, मार्मिक, सामनाचे संपादक, बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे की बातमीमध्ये मी पणा नसावा अशी पत्रकारिता आज आहे का? प्रसार माध्यमांवर नियंत्रण आणायचे प्रयत्न होत असताना स्वतंत्र पूर्व काळात महात्मा गांधींनी म्हटले आहे की वृत्तपत्राची गरज त्यामागील प्रेरणा होती त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही अधिक सुरक्षित करण्यासाठी घटनेसाठी लढा दिला बोलण्याच्या आणि माहिती मिळवण्याच्या क्षमतेतून सामान्य माणसांचे खरे सक्षमीकरण होत आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांचा आवाज बंद करू तेव्हा लोकशाहीचे अस्तित्व संपलेले असेल.
संख्या, सत्ता, आणि सत्य या तीन शक्ती आहेत या पुष्कळवेळा परस्पर विरोधात उभ्या राहिलेल्या असतात संख्या आणि सत्ता असणाऱ्यांनी सत्याला लुबाडण्याचे फसवण्याचे प्रयत्न केल्याची नेहमीच दिसून येते पण सत्याला पराभूत करण्याची शक्ती संख्या बहुमत यांच्यात नाही याची ग्वाही इतिहास देतो याचा विसर कोणालाही होऊ नये. आणीबाणीच्या वेळी जयप्रकाश नारायण यांनी म्हटले आहे की अखंड लोक जागृती शिवाय लोकशाहीचे रक्षण होत नाही.
तरी स्वतःला निर्भिड पत्रकारांनी लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, आचार्य अत्रे यांची नावे घेणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की समाजाला दिशा देता येत नसले तरी चालेल, पण समाजाचे दिशाभूल न करणे ही पत्रकारितेची विश्वासहर्ता आहे. याचा विचार टी आर पी वाल्यांनी करावयास हवा.