
सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी मुंबईस्थित चाकरमान्यांच्या मदतीला धावणार का ?
सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी मुंबईस्थित चाकरमान्यांच्या मदतीला धावणार का ?
सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन हा 14 एप्रिल ला संपण्याची शक्यता फार कमी असून तो वाढवला जाण्याची शक्यता आहे.. कोकणातील बहुतांश चाकरमानी वर्ग हा गावात नोकरी च्या संधी उपलब्ध नसल्यांने किंवा व्यवसाय करण्या एवढा पैसा नसल्याने नाईलाजाने मुंबईत झोपडपट्टी विभागात काही हक्काच्या रूम मध्ये तर 80 टक्के लोक भाड्याच्या खोलीत राहतात..आणि झोपडपट्टी वस्तीत घरात शौचालय नसून सार्वजनिक शौचालय असल्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात..तसेच काही न काही गरजेच्या वस्तू आणायला बाजारात जावेच लागते. त्यामुळे यात सामान्य नागरिकांचा संपर्क होऊन संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे..
आता कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर मुंबईतील गर्दी कमी करणे हाच उपाय आहे. त्यासाठी मुंबई पुणे यांसारख्या शहरातून लोकांना बाहेर काढणे गरजेचे आहेत..कारण झोपडपट्टीत हा आजार पसरायला जास्त वेळ लागणार नाही..आणि मग यातून कोणीच वाचू शकणार नाही..मुख्य म्हणजे मुंबईत असणारी रुग्णालये आत्ताच कमी पडू लागली आहेत..हा आजार पसरला तर डॉक्टर्स तसेच इतर वैद्यकीय यंत्रणाही पुरु शकणार नाही.त्यामुळे ज्यांना गावी पाठविणे शक्य आहे त्या सर्वांना रीतसर वैद्यकीय तपासणी करून गावाकडे जाण्यास गावातील ग्रामपंचायती, आमदार, खासदार यांनी देखील नाहरकत देणे किंवा प्रयत्न करणे गरजेचे आहे यामुळे 4 दिवसात पूर्ण मुंबई जवळ जवळ 50% ते 70% खाली होऊन मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना देखील सुटसुटीत जीवन जगता येईल..तसेच मुंबईतील पोलीस यंत्रणेवर देखील ताण पडणार नाही... आम्ही खालील महत्वाच्या मुद्यांवर आपले लक्ष वेधू इच्छितो,
●कोकणातील 40 ते 50 टक्के माणूस हा मुंबईत
●मुंबईत १०×१० च्या रूम मध्ये भर उन्हाळ्यात ५ ते ६ जण परिवाराला सोबत राहणे असह्य
●सार्वजनिक शौचालयांमुळे कोरोना चा धोका अधिक
●ज्यांचे वृद्ध आई वडील गावी आहेत ते कोरोना च्या धास्तीने मानसिक त्रस्त
●जीव मुठीत घेऊन जगताहेत जीवन
●अनेकांचे हातावरचे पोट किंवा पगार न झाल्याने किंवा निम्मे पगार झाल्याने रूम भाडे, वीज बिल, पाणी बिल आदी देणे होऊन बसले कठीण..कसे जगावे हा प्रश्न निदान गावी चटणी भाकर तरी खाऊन राहू शकतो
●अनेक लोक छोट्याश्या प्रॉब्लेम मुळे मुंबईत येऊन अडकून बसले आहेत व सुमारे 20 दिवस परिवारापासून दूर त्यामुळे परिवाराला चिंता
●रत्नागिरी रायगड येथील आमदारांनी सरकारकडे चाकरमान्यांना गावी सोडण्याची मागणी करून एक माणुसकीचा हात तरी पुढे केला पण सिंधुदुर्गातील लोकप्रतिनीधी गप्प का ? एरवी ग्रामपंचायत निवडणुकीपासून विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही गाड्या पाठवता मग आता गप्प का ?
●आज जेवढ्या अभिमानाने तुम्ही सांगत आहात कि आमच्या जिल्ह्यात कोरोना नाही पण जेव्हा हा आजार मुंबईच्या झोपडपट्टीत पसरेल तेव्हा तुम्हाला मान खाली घालुन बोलावे लागेलं की जे गरीब मेले ते आपल्या सिंधुदुर्गातील मुंबईस्थित चाकरमानी होते. त्यामुळे सिंधुर्गातील तीनही आमदार नितेश राणे, वैभव नाईक व दीपक केसरकर तसेच खासदार विनायक राऊत हे यात पुढाकार घेणार का ?
●घरातील कर्ता धरता पुरुष मृत्यू झाल्यास त्यांची जबाबदारी कोण घेणार ? ना सरकार ना कोणी
●एप्रिल,मे महिन्यामध्ये जाणाऱ्या जाणारे कोकणातील लोकही आज सर्व बंद असल्या कारणाने आपल्या गावी जाऊ शकत नाहीत
आमची एवढीच विनंती आहे की आमची पूर्ण वैद्यकीय तपासणी करून आम्हाला गावी यायची व्यवस्था करा..