धाडस म्हणजेच मुंबई पोलीस....

धाडस म्हणजेच मुंबई पोलीस....

    भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी काळाचौकी येथे एका तरुणाने एका तरुणीवर धारदार हत्याराने वार केले, प्राथमिक माहिती मिळता असं समजले की, हे दोघं तरुण-तरुणी चिंचपोकळी काळाचौकी दत्ताराम लाड, या मार्गावरून शुक्रवारी ११.०० वाजता काळाचौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चिंचपोकळीच्या दिशेने जात होते अचानक त्या तरुणाने धारदार शस्त्राने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली स्वतःचा जीव वाचवा म्हणून ती तरुणी धावत धावत जवळच्या आस्था नर्सिंग होम मध्ये शिरली रस्त्यावरील येणारे जाणारे स्थानिक तरुण तिला सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. चाललेली धावपळ लक्षात येता  कर्तव्यावर असणारे भायखळा डिव्हिजनचे वाहतूक पोलिस हवालदार किरण सूर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखून लागलीच त्या मुलीला बाहेर ओढलं त्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला असता. त्याने स्वतःचा गळा चिरला, काळाचौकी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त आर. रागसुधा व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्या तरुण तरुणीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

    मुंबई पोलीस दलात अशा बहादूर जवानांची गरज आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जी बहादुरी त्यांनी दाखवली खरोखर वाखाण्याजोगे आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week