खुनाचे प्रयत्नासह दरोड्याच्या गुन्हयातील ३ आरोपींना अटक !!

खुनाचे प्रयत्नासह दरोड्याच्या गुन्हयातील ३ आरोपींना अटक !!

       खुनाचे प्रयत्नासह दरोड्याच्या गुन्हयातील ३ आरोपींना अटक करुन १० लाख रुपयेचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष २, वसई यांना यश !!

        वालीव पोलीस ठाणे येथील गु.रजि.क्र. ५४७/२०२५ बी. एन. एस. कलम १०९, ३११, ३०९(६), ३३२ (बी), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी श्रीमती गिता चित्रसेन राऊत, वय ३७ वर्षे, रा. रिलायबल ग्लोरी बिल्डींग, ई/३०१, दामुपाडा, सातीवली, ता. वसई पश्चिम यांचा मुलगा संतोष याचे सोबत दिनांक १८/११/२०२५ राजी १३.१० वाज्याच्या सुमारास त्यांचे राहते घरात हजर असताना, तिन अनोळखी इसमांनी त्यांचे घरात जबरदस्तीने प्रवेश करुन फिर्यादी व त्यांचा मुलगा संतोष यांना पकडुन त्यांचे गळयाला हातातील चाकु लावून सोने कोठे आहे? असे विचारले असता, फिर्यादी यांनी त्यांना माहीत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यामधील एकाने फिर्यादी यांचेवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वार केला असता, तो फिर्यादी यांनी चुकवीला पंरतु फिर्यादी यांना डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

     अनोळखी तिन आरोपींनी फिर्यादी यांचे घरातील कपाटातील १२ तोळे सोन्याचे दागीने व एक विवो कंपनीचा मोबाईल असा ऐवज खुनाचे प्रयत्नासह जबरीने चोरुन घेवुन गेले आहेत. सदर बाबत वालीव पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दिनांक १८/११/२०२५ रोजी दाखल आहे.

         गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष २, वसई कार्यालयाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळ व आजूबाजूचे परीसरात कौशल्यपुर्ण तपास करुन व गुप्त बातमीदारांकडुन माहीती प्राप्त करुन आरोपी ईसमांची ओळख पटविण्यात आली. आरोपी हे नंदगाव, ता. हुमनाबाद, जि. बिदर, राज्य कर्नाटक येथे वास्तव्यास असल्याची माहीती प्राप्त करुन तात्काळ तपास पथक रवाना करुन गुन्हयातील ३ आरोपीतांना दिनांक २०/११/२०२५ रोजी चोरीस गेलेल्या दागिन्यांतील ८ तोळे सोन्याचे दागिने तसेच आरोपीतांचे अंगझडतीतून मिळालेली रोख रक्कम व मोबाईल असा एकुण १०,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमालसह ताब्यात घेण्यात आलेला आहे.

       आरोपीकडे केलेल्या तपासात त्यांचे सोबत इतर ३ साथीदार आरोपी असल्याचे निष्पन्न करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपीतांची नावे खालील प्रमाणे :-

१) अशोक ऊर्फ बाबु राजु शिंदे, रा. शांतीनगरडोंगरी पाडा, वसई पूर्व मुळ रा. नंदगाव, ता. हुमनाबाद, राज्य- कर्नाटक,

२) अब्दुल रऊफ हाशमी, रा. रिचड कंम्पाऊन्ड मनिचा पाडा, वसई पूर्व, मुळ रा. मडियाहू, जि. जौनपुर राज्य उत्तरप्रदेश,

३) रितीक रवी बेलंगी, रा. रिचड कंम्पाऊन्ड मनिचा पाडा, वसई पूर्व, मुळ रा. नंदगाव, ता. हुमनाबाद, राज्य कर्नाटक.

निष्पन्न साथीदार आरोपीतांची नावे :-

१) नुर हसन खान रा. पाटील वाडी, नवजीवन, नालासोपारा पूर्व

२) सुरज किशोर जाधव रा. शांतीनगर, इंदिरा वसाहत, नालासोपारा पूर्व

३) काळु प्रभाकर साहू रा. केंद्रपाडा, राज्य ओरीसा

     नमुदचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरन शाखा कक्ष २, वसई कार्यालयाने उघडकीस आणून ताब्यात घेतलेल्या ३ आरोपीतांना गुन्हयाच्या पुढील कारवाईकरीता वालीव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हयाचा तपास वालीव पोलीस ठाणे करीत आहेत.

        सदरची कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे अपर पोलीस आयुक्त, मा. श्री संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-२ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, संतोष घाडगे, सहाय्यक फौजदार संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहूल कर्पे, प्रशांत ठाकूर, दिलदार शेख, पोलीस अंमलदार अनिल साबळे, अक्षय बांगर, महाराष्ट्र सुरक्षा बल रामेश्वर केकान, तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर शाखा,  मीरा-भाईंदर वसई-विरार यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week