
शुभंकरोती साहित्य मंडळातर्फे समर्थ नारी पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा !!
शुभंकरोती साहित्य मंडळातर्फे समर्थ नारी पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा !!
मुंबई वांद्रे : दिनांक ३० मार्च रोजी नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे शुभंकरोती साहित्य मंडळ व नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय समर्थ नारी पुरस्कार २०२४ व कवी संमेलन नुकतेच पार पडले. लेखक कवी श्री. चंद्रकांत वानखेडे कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती हेमांगी नेरकर व नॅशनल लायब्ररी वांद्रे यांचे झारापकर आणि शुभम करोति साहित्य मंडळाच्या संस्थापिका अध्यक्ष श्रीमती सोनाली जगताप, डॉक्टर माया यावलकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी विविध कार्यक्षेत्रातील २० महिलांना राज्यस्तरीय समर्थ नारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, सन्मान म्हणून प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी अभिनेत्री सोनालिका जोशी यांनाही सन्मान देऊन गौरविण्यात आले.
ह्यावेळी एडवोकेट समृद्धी अनिल पवार या उभयंतांचा सुद्धा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी निमंत्रितांचे कवी संमेलनही मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडले यात महेश भामरे ध्रुवखुरे, कुमुदिनी शहारकर बबनराव तसेच अनेक मान्यवर कवी व कवियत्री गझलकार यांच्या कविता सादर झाल्या रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कवी संमेलनास लाभला. उपस्थित करणे कवियत्री यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऋष्या पारेख यांनी इशस्तवन गायिले तर कार्यक्रमाच्या शेवटी हरिश्चंद्र धीवर यांनी आभार प्रदर्शन केले. आणि शिट्टी वादक रुपेश मुरुडकर यांच्या शिट्टी वादन राष्ट्र गानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.