शुभंकरोती साहित्य मंडळ बांद्रा तर्फे कवी संमेलन व समर्थ नारी पुरस्कार !!

शुभंकरोती साहित्य मंडळ बांद्रा तर्फे कवी संमेलन व समर्थ नारी पुरस्कार !!

     मुंबईतील साहित्य मंडळ तर्फे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो, यावर्षी शनिवार दिनांक ३० मार्च २०२४ रोजी समर्थ नारी पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, समाजातील कर्तृत्ववान महिला तसेच काही साहित्यिक मंडळी यांचा सत्कार शुभंकरोती साहित्य परिवार करत असते.

      यावर्षीही मुंबईतील बांद्रा येथे नॅशनल लायब्ररीमध्ये समर्थ नारी पुरस्कार देण्याचा कौतुकमय सोहळा पार पडण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक चंद्रकांत दादा वानखेडे, कोशाय प्रकाश पुणे, हे संमेलनाध्यक्षाचे पद भूषविणार आहेत तसेच डॉक्टर श्री सुकृत खांडेकर, संपादक दैनिक प्रहार, कार्यक्रमाच्या उद्घाटीका लेखिका संपादिका सौ हेमांगी नेरकर, माननीय सौ सोनाली जगताप, संस्थापक अध्यक्ष शुभंकरोती साहित्य मंडळ प्रमोद महाडिक, कार्यकर्ता नॅशनल लायब्ररी माननीय डॉक्टर श्री हरीशचंद्र घिवर, अंकिता गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत.

        यावेळी महिला सन्मानाखेरीज शुभंकरोती साहित्य मंडळाच्या परिवारातील काही मंडळींचे सत्कार करण्यात येणार आहेत त्यात मा अस्मिता पंडित, कुमुदिनी शहाकर, ऋचा पारेख, हेमंत कुलकर्णी, हरिश्चंद्र सरोज भिडे, इत्यादी मान्यवरांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

          शुभंकरोती साहित्य मंडळ समर्थ नारी पुरस्कारासाठी सौ. सोनालिका जोशी (तारक मेहता का उल्टा चश्मा) यांच्या मातोश्री माननीय प्रतिभाताई कुलकर्णी, दूर्वा मुरुडकर, ज्येष्ठ साहित्यिका जयश्री चौधरी सूत्रसंचालक सौ. जागृती पंडित, संपादिका सौ अनिता अरुण घायवट, साहित्यिका माननीय लता गुठे, अभिनेत्री आरती साळवे, समाजसेविका मा. मनीषा मुरुडकर, आदर्श शिक्षिका मा. सरोजनी बोराट, ॲड रोहिणी जाधव, प्राचार्य स्मिता सहस्त्रबुद्धे, तसेच कीर्तनकार मानसी पंडित,अँड. समृद्धी पवार, अनिल पवार स्क्रिप राईटर, कथाकार शिल्पा सराटे, साहित्यिक लक्ष्मी रेड्डी पुणे, साहित्यिका गीतांजली वाणी, पुष्पाताई कोल्हे, सलोनी बोरकर, स्वाती पोळ, ऋतुजा कुलकर्णी, मीनाक्षी उपाध्याय, रेखाताई डोंबाळे, समाजसेविका तसेच पत्रकार/ साहित्यिका माननीय प्रीती तिवारी इत्यादी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे,

        कार्यक्रमांतर्गत निमंत्रित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे कवी संमेलनात मा. गुलाबराजा फुलमाळी, मा.  मनोज धुरंधर, मा. ध्रुव.खुरे पुणे राजेंद्र वाणी, अजितदादा महाडकर, ठाणे किसन वराडे, श्री महेश भामरे/ कवी नंदेय. गझलकार मनोज वराडे, माननीय रविंद्र देशमुख, कमलाकर राऊत ज्येष्ठ गजलकार माननीय बबन धुमाळ तसेच अनेक निमंत्रित मान्यवरांचे कवी संमेलन होणार आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week