वसईत तीन तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ !!
वसईत रविवारी संध्याकाळी बंदघरात तीन तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आजूबाजूच्या रहिवाशांनी घरात वास येत असल्याने माणिकपूर पोलीसाना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवाविच्छेदन करण्यासाठी नवघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलेले आहेत. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा पोलीस शोध घेत आहेत.
सदर घटना गॅस लिकेज मुळे झाली असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. माणिकपूर नाक्याच्या नौपाडा रोड वरील आशा सदन या चाळीत मे महिन्यापासून भाड्याने राहणाऱ्या, मूळ उत्तर प्रदेश गोंडा येथील राहवाशी मोहम्मद आझम मोहम्मद सलीम(३१), शफी अहमद रफी अहमद,(,२८) आणि सादिक अली (२८) यांचा मृत्यू झाला आहे.१ते३ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडल्याचा पोलिसांनी दाट संशय व्यक्त केला आहे.
बंद घरात वास येत असल्याने आजूबाजूच्या रहिवाशी यांनी घराचे मालक सुरेश अल्मेडा यांना कळवले. त्यांनी सदर बातमी माणिकपूर पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविलेले आहेत. घराचा दरवाजा आतून बंद होता. गॅस लिकेजने ही घटना झाल्याचा संशय आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर स्पष्ट होईल.