
वरळी स्मशानभूमीत जाळलेल्या स्टॅम्प पेपरच गौडबंगाल काय????
वरळी स्मशानभूमीत जाळलेल्या स्टॅम्प पेपरच गौडबंगाल काय????
आज वरळी स्मशानभूमी येथे शासकीय स्टॅम्प पेपर जाळण्यात आले.
वरळी स्मशानभूमी तशी गजबजलेल्या ठिकाणी आहे, परंतु आज इथे मोठ्या प्रमाणावर शासकीय स्टॅम्प पेपर जाळण्यात आले. एक नाही दोन नाही तर 50 हून अधिक गोण्या स्टॅम्प पेपर भरून आणले गेले व एका अज्ञात इसमाने ते स्टॅम्प पेपर स्मशानभूमीमध्ये जाळले व तिथून तो पसार झाला आहे.
शासकीय स्टॅम्प पेपर डॉक्युमेंट्स मशीनमध्ये त्याचे तुकडे करून गोण्यामध्ये भरून आणण्यात आले व वरळी स्मशानभूमी येथे मोठ्या प्रमाणावर ते जाळण्यात आले. एका खड्ड्यामध्ये संपूर्ण स्टॅम्प पेपरचे तुकडे टाकून त्यांना आग लावण्यात आली. उडणारे स्टॅम्प पेपरचे तुकडे बघून आजूबाजूच्या रहिवाशांनी स्मशानात गर्दी केली. शासकीय स्टॅम्प पेपर ना आग लावून अज्ञात व्यक्ती तिथून पसार झाला.
वरळी येथील रहिवाशी दीपक साबळे यांनी साडेदहा वाजता पाहिले एका टेम्पोमध्ये 50 गोण्या घेऊन अधिक स्टॅम्प पेपर शासकीय कागदपत्रे भरून आणली होती त्या शासकीय कागदपत्राचे भाग मशीनवर तुकडे करण्यात आले होते आणि ते स्टॅम्प पेपर पुण्यात भरून वरळी येथील स्मशानात घेऊन आले दोन-तीन दिवसापासून ती कागदपत्रे तेथे जाळण्यात येत होती परंतु आज जास्तीच्या प्रमाणात स्टॅम्प पेपर जाळण्यात आले.
उठलेल्या धुराचा लोट पाहून तेथील रहिवासी स्मशानात आले व त्यांनी पाहिले की गोणी भरून आणलेले स्टॅम्प पेपर तेथे जाळण्यात येत होते. पोलिसांनाही त्याची माहिती मिळतात पोलीस तेथे हजर झाले आणि ते स्टॅम्प पेपर कोणी जाळले त्याची चौकशी केली परंतु त्यांनाही काही हाती लागले नाही, शासकीय डॉक्युमेंट कोणत्या कारणास्तव जाळले गेले त्याची अधिक तपासणी पोलीस करीत आहेत. आणि ते कोणत्या अज्ञात इसमाने जाळले त्याचा तपासही करीत आहेत.