अकरा वर्षीय शाळकरी मुलाने केली आत्महत्या !!

अकरा वर्षीय शाळकरी मुलाने केली आत्महत्या !!

      नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा काजू पाडा परिसरात अकरा वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. बुधवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. महेश शंकर राठोड वय वर्ष ११ असे या मयत मुलाचे नाव आहे. नायगाव पूर्व येथील वाकी पाडा येथे काजू प्लॉट परिसर आहे येथे एका चाळीत महेश हा मुलगा आपली आई शांता राठोड व लहान भाऊ यांच्या सोबत राहत होता व कर्मवीर भाऊराव पाटील या शाळेत इयत्ता सातवीत तो शिकत होता.

             वडील नसल्याने आई घरकाम करून मुलांचा सांभाळ करीत आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी आई घरकामासाठी गेली असताना, घरात कोणी नसताना महेश याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले. गळफास नेमका कोणत्या कारणामुळे घेतला, याचे कारण अद्याप समजले नसून नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दिली आहे या प्रकरणी पोलीस अजून तपास करीत आहेत.

             महेशच्या मृत्यूमुळे आजूबाजूचा परिसर शोक व्यक्त करण्यात येत आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week