
निराधार स्त्रियांना आर्थिक सक्षम बनवा !
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरीता, सन्मान मिळवून देण्याकरीता, गंगा भागीरथी असा शब्द वापरावा, असा प्रस्ताव सरकारकडे दिला असता, समाज माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा होत असून शब्द बदलून वास्तव बदलता येत नाही. पतीच्या मृत्यूच्या अंतिम संस्काराच्या वेळी, विधवा झालेल्या स्त्रीची प्रथा परंपरा म्हणून मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे इ संस्कार विधवा स्त्रीच्या द्वारे करण्यात येतात.
अशा प्रथा परंपरेला आताच्या आधुनिक युगात योग्य आहेत का ? तरी सरकार तर्फे विधवा स्त्रियांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजना सुरु केलेली आहे. या योजनेमध्ये वार्षिक उत्पन्न २१ हजार असलेल्या स्त्रियांना आणि मुले २१ वर्ष आतील असावी. अशा परिस्तिथीत घरगुती गॅस, इलेक्ट्रिक बिल, घर भाडे, अषधोपचार इ होणारा खर्च एका वर्षात रु २१ हजार होऊ शकतो का ? मासिक हजार रु लाभ / पेन्शन मिळते. तरी आता उत्पनाची (रु १ ते २ लाख आणि मासिक लाभ रु ५ हजार पर्यंत) मर्यादा वाढवावी. तरच निराधार स्त्रिया आर्थिक सक्षम होऊ शकतील.