
वरळी विधान सभेत भाजपाच्या हक्काचे कार्यालयाचा मोठ्या दिमाखात उदघाटन सोहळा संपन्न !!
वरळी विधान सभेत भाजपाच्या हक्काचे कार्यालयाचा मोठ्या दिमाखात उदघाटन सोहळा संपन्न !!
दिनांक ७ फेब्रुवारी 023 रोजी वरळी विधानसभा भाजपा यांच्या हक्काच्या कार्यालयाचे मोठ्या दिमाखात ढोल टाशाच्या गजरात अनावरण करण्यात आले आजपर्यंत वरळी विधानसभेत इतर पक्षांची स्वतःची कार्यालये आहेत. परंतु भाजपा चे कार्यालय नव्हते. त्यामुळे तातपुरत्या घेतलेल्या जागेत सभा, अथवा एखादा कार्यक्रम आयोजित करावा लागत होता.
परंतु भाजपच्या हक्काचे कार्यालय मिळाल्यामुळे भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात उत्साह होता. महाराष्ट्र राज्याचे केबीनेट मंत्री मा. श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन झाले. भाजपा मुंबई अध्यक्ष श्री ऍड. आशिष शेलार, तसेंच भाजपचे बोरिवली आमदार श्री सुनील राणे याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
उद्घानप्रसंगी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष श्री. पवन त्रिपाठी, भाजपा जिल्हा सर चिटणीस दिपक सावंत, भाजपा वरळी विधान सभा अध्यक्ष दिपक पाटील. युवा मोर्चा वरळी विधानसभा अध्यक्ष मदन गुप्ता, भाजपा वरळी विधानसभा अध्यक्ष (भटके विमुक्त आघाडी) गणेश नागरे तसेच महिला वरळी विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा साक्षी सावंत, महिला मोर्चा वरळी विधान सभा उपाध्यक्षा विमला पोवार, आरती पुगावकर तसेंच इतर महिला पदाधिकारी महिला कार्यकर्त्या, पुरुष कार्यकर्ते तसेच आजूबाजूचे लोक यांनी कार्यक्रमास हजेरी लावली.
निवडणूक तोंडावर आल्या असल्याने भाजपच्या हक्काच्या कार्यालयाचे उदघाटन झाले, त्यामुळे कार्यकर्त्याना हक्काची जागा मिळाली असुन कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत भाजपा आपला झेंडा मुंबई व वरळी विधान सभेवर फडकविण्यास किती यशस्वी होतो हे पाहण्यासाठी जनतेत उत्सूकता निर्माण झाली आहे.