शिंदे सरकार, मनपा आयुक्त इथे लक्ष देतील का? केईएम, नायर मधील हजारो रुग्णांचे हाल, चाचणी अभावी शस्त्रक्रिया रखडल्या !!

शिंदे सरकार, मनपा आयुक्त इथे लक्ष देतील का? केईएम, नायर मधील हजारो रुग्णांचे हाल, चाचणी अभावी शस्त्रक्रिया रखडल्या !!

       केईएम आणि नायर l ही मुंबई महानगर पालिकेची जागतिक ख्यातीची रुग्णालये.  मुंबईतील ही दोन रुग्णालये सर्व मशिनिरीने सुसज्ज आहेत. रोज हजारो रुग्ण  तिथे तपासणी साठी येत असतात. शेकडो रुग्णांच्या मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया होत असतात. हजारो रुग्ण इस्पितळात इलाज करण्यासाठी दाखल आहेत. परंतु  महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे गेल्या तीन महीन्यापासून या दोन्ही रुग्णालयामधील सिटी स्कॅन मशिन्स बंद पडल्या आहेत. त्यामुळे हजारो रुग्णाचे हाल होत असून, ह्या महत्वाच्या चाचण्या होत नसल्याने शेकडो शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी केंद्रावर जाऊन चाचणी साठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. सिटी स्कॅन चे शुल्क हे एक हजार  रुपयांपासून वीस हजारा पर्यंत आहे.

            केईएम आणि नायरसारख्या महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन्स चोवीस तास व्यस्त असतात. कारण या रुग्णालयामध्ये रूग्णांची संख्या ही मोठी असते. त्यामुळे या मशीनची देखभाल दुरुस्ती किंवा नवीन मशीन लावणे या प्रक्रिया वेगाने केल्या गेल्या पाहिजेत. मात्र महापालिका आयुक्तांचे त्याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. पर्यायाने ह्या रुग्णालयाचे अधिष्ठाताही कारभारा बद्दल गंभीर दिसून येत नाहीत.

            महानगरपालिकेचा कार्यकाल संपल्या नंतर प्रशासक असलेल्या पालिका आयुक्तांचे रुग्णालयांकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे केईएम व नायर रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन अनेक महिने बंद आहेत. तसेच नायर मधील रेडिशन सेंट, स्पाइनचे MRI सेंटर,१५ बेडचे ICU सेंटर ही बंद अवस्थेत आहेत. शल्य चिकित्सा रूम मध्ये वारंवार AC बंद पडून प्रॉब्लेम होत असतात. काही शल्य चिकित्सा रूमची दुरुस्तीची कामे अर्धवट पडली आहेत, त्यामुळे कितीतरी शस्त्रक्रिया ऑपरेशन थेटर उपलब्ध नसल्या मुळे पुढे ढकलल्या जातात. ह्याचा त्रास पेशंट बरोबर डॉक्टरांनाही होत असतो आणि दुसऱ्या शल्य चिकित्साचे रूम घेऊन ऑपरेशन पार पाडावी लागतात. त्यामुळे डॉक्टरांची ही आधावत होत असते. पेशंट ना अधिक काळ रुग्णालयात राहावं लागत.

               मशिनरी बंद असल्यामुळे चाचण्या करण्यासाठी रुग्णांना खाजगी केंद्रावर नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे ह्या रुग्णालयात रोज  मुंबई, महाराष्ट्रातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असून, चाचणी अभावी अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे व त्यासोबत नातेवाईकांचे ही इथे तिथे धावपळ करून हाल होत आहेत.

              पालिका आयुक्त जागे व्हा लोकांचा अंत पाहू नका ! नाहीतर तुम्हाला मुंबापुरीत राहणं मुश्किल होईल असे संतप्त उद्गार रुग्णांचे नातेवाईक काढत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी