
ऍड समृद्धी पवार यांचा राष्ट्रीय आदर्श पुरस्कार देऊन सत्कार !
ऍड समृद्धी पवार यांचा राष्ट्रीय आदर्श पुरस्कार देऊन सत्कार !
कला साधना सामाजिक संस्था कामोठे नवी मुंबई यांच्या वतीनं जागतिक शिक्षक दीनानिमित्ताने संपूर्ण भारतातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक स्तरांवर समाजातील विविध क्षेत्रातील प्रामाणिक, होतकरू, क्रियाशील सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत निस्वार्थ कार्य करणाऱ्या शिक्षक, डॉक्टर, वकील, पत्रकार, समाजसेवक, साहित्यिक आणि विविध स्तरांवर कार्य करून जनसेवेसाठी दिवसरात्र कार्य करणाऱ्या लोकांना संस्थेच्या वतीने त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरांवर दखल घेवुन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येते.
अशाच आपल्या मुंबई येथील बोरिवली उपनगरात वास्तव्य करणाऱ्या, सुप्रसिद्ध, ख्यातनाम वकिली व्यवसायात मुंबई शहरात अग्रेसर असलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अँड.सौ.समृद्धी पवार बोरिवली यांना समाजातील गोरगरीब, अत्याचार महिला व पुरुष वर्गाला विनामूल्य न्याय मिळवून देण्यासाठी न्यायविधी समुपदेशक समाजसेविका म्हणून कला साधना सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने त्यांच्या सामाजिक, विधिन्याय सेवेची, कार्याची दखल घेवून त्यांना संस्थेच्या वतीने दि.११/०९/२०२२ रोजी खारघर येथे हॉटेल थ्री स्टार पंचतारिक हॉटेलात राष्ट्रस्तरीय आदर्श लोकप्रियताचा विधी सल्लागार व समाजसेविका पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्याबद्दल समाजातील सर्व स्तरांतून यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.