
राजे प्रतिष्ठान लोअर परळ मुंबई तर्फे सागरी किनारा स्वछता मोहीम !!
राजे प्रतिष्ठान लोअर परळ मुंबई तर्फे सागरी किनारा स्वछता मोहीम !!
सागरी किनाऱ्यावर वसलेली मुंबई आणि विस्तीर्ण सागरी किनारे हे मुंबईचे वैभव आहे. मुंबईचे सागरी किनारे चौपाटी हे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकास आकर्षित करीत असतात. परंतु सागरी किनारे, चौपाटीची हवी तशी स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे सागरी किनाऱ्याच्या सौंदर्याला बट्टा लागतो. आणि पर्यावरणास हानी पोहचत आहे.
आताच अनंतचतुर्दशीचा सोहळा मोठ्या दिमाखात आंनद जल्लोषात साजरा झाला. आपल्या आवडत्या बाप्पाला सगळ्यानी आनंदात डोळे भरून निरोप दिला. मुंबईतील प्रत्येक चौपाटीवर बाप्पाच विसर्जन करण्यात आलं, परंतु विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र ठिक ठिकाणी गणेश मुर्त्या अस्ताव्यस्त काही पूर्ण तर काही अस्ताव्यस्त किनाऱ्यावर विखुरलेल्या आढळतात. हल्ली शाडू माती पेक्षा प्लास्टर ऑफपँरीस च्या मुर्त्या मोठ्या प्रमाणात बनविल्या जातात स्वस्त आणि मोठ्या वजनाने हलक्या असलेल्या पीओपी च्या मुर्त्या ह्या पाण्यात शाडू प्रमाणे लगेच विरघळत नाहीत. त्यामुळे समुद्राला अहोटी आल्यावर त्या भग्न अवस्थेत विखुरकलेल्या आढळतात.
त्यामुळे समुद्र किनारे अत्यंत दुरावस्थेत होतात. दादर चौपाटी मुंबई येथे दरवर्षी कितीतरी गणेश मूर्तीचं विसर्जन होत असत. आणि दुसऱ्या दिवशी चौपाटी अत्यंत घाणेरडी झालेली असते. म्हणून दिनांक 11 सप्टेंबर रोजी राजे प्रतिष्ठान लोअर परळ मुंबई यांनी पर्यावरणाच्या हितासाठी दादर चौपाटी येथे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवली. ह्या अंतर्गत समुद्र किनारा स्वछ करण्या सोबत कितीतरी अविसर्जीत झालेल्या गणेश मूर्त्यांची व्हिलेवाट लावण्यात आली ह्या मोहिमेस मुलांसोबत मुलींनी देखील उस्फुर्त प्रतिसाद दिला व समुद्र किनारा स्वछता मोहीम यशस्वी पार केली.