
जी साऊथ व्यापारी असोसिएशन मुंबई तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोअर परेल येथे उत्साहात साजरा !!
जी साऊथ व्यापारी असोसिएशन मुंबई तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोअर परेल येथे उत्साहात साजरा !!
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देश साजरा करीत आहे, आणि त्या निमित्ताने हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. त्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून आनंद जल्लोष साजरा केला. कदाचित प्रथमच सर्व देशवासीयांना कपड्याचा तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली. जन सामान्यांनी आपल्या परीने अमृत महोत्सव साजरा केला.
जी साऊथ व्यापारी असोसिएशन तर्फे मुंबई लोअर परेल येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ह्या मंगल प्रसंगी मा. योगेश कुमार (DCP, zone ३) व ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सुनील चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाने जी साऊथ व्यापारी असोशियन व जैन संघ लोअर परेल आणि स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी मा. योगेश कुमार DCP झोन ३ यांनी जमलेल्या सर्व देश बांधवांना शुभेच्छा दिल्या, मा योगेश कुमार यांचे गुलाबाची फुले देऊन स्थानिक रहिवाश्यांनी स्वागत केले.