
मोहरम निमित्त वाहतूक विभागाने केले नियोजन !!
सार्वजनिक गणपती प्रमाणे इस्लाम धर्माचा मोहरम ताजिया हा उत्सव देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मोहरम हे इस्लामिक कॅलेंडर मधील पहिल्या महिन्याचे नाव. ह्या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरवात होते. मोहरम महीन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे करबला येथे शहीद झाले होते. म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात, आणि ताजिया म्हणजे ताबूतची मिरवणूक काढून नंतर जलाशयात समुद्र किंवा तलावात विसर्जन करतात. मोहरम हा मुंबईतही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो बहुतांश ठिकाणी ताजियाच्या मिरवणुका निघतात ह्या दिवशी शासकीय सुट्टी असते.
मुंबई म्हणजे नेहमी वाहनांनी गजबजलेली मग अशा वेळी ताजियाच्या मिरवणुकीस काही अडथळा येऊ नये ह्यासाठी दिनांक ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या मोहरम निमित्त मुंबई वाहतूक विभागाने दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या दि. ८ व ९ ऑगस्ट २२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १:३० पर्यंत मोहरम निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी मुळे वाहतूक व्यवस्था लालबाग ब्रिज वरून राणी जिजामाता उद्यान, संत सावता माळी मार्ग डावे वळण, नाथ पै मार्ग उजवे वळण, पी डिमेलो रोडकडे वळवण्यात येईल.
तसेच दक्षिण मुंबई लालबागच्या ब्रिज खालून दादोजी कोंडदेव मार्ग डावे वळण, पठाणवाला मार्ग वरून सरळ, नाथ पै मार्ग उजवे वळण, पी डिमेलो रोड वरून वळवण्यात येईल.
मोहरम मिरवणुकी दरम्यान संध्याकाळी ७ ते रात्री १:३० वाजे पर्यंत ८ ते ९ ऑगस्ट रोजी वाहतूक उत्तर मुंबई वाहतूक ही चकाला जंक्शन गोल देऊळ टेम्पल,
(Duncan) रोड, नागपाडा जंक्शन खडापारसी (Khadaparsi) ते भायखळा रेल्वे ब्रिज.
साऊथ बॉण्ड वाहतूक जे जे ब्रिज नागपाडा पोलीस हॉस्पिटल डावे वळण नागपाडा जंक्शन खडा पारशी वरून वळून भायखळा रेल्वे ब्रिज अशी करण्यात आली आहे.