भायखळा विधानसभा शिवसेना शाखा क्रमांक २१२ तर्फे ३१ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन !!

भायखळा विधानसभा शिवसेना शाखा क्रमांक २१२ तर्फे ३१ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन !!

       भायखळा विधानसभा शाखा क्रमांक २१२ शिवसेने तर्फे, माजी मुख्यमंत्री पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ३१ जुलै २२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ ह्या वेळेत आग्रीपाडा, महानगरपालिका शाळा, वाय एम सी ए स्विमिंग पूल समोर फारूक उमर भाई पथ, आग्रीपाडा येथे आयोजित करण्यात आले आहे. दोन वर्षे करोना महामारीत गेले. प्लाझ्मा, रक्त वेळेवर न मिळाल्यामुळे कितीतरी लोकांचे प्रियजन सोडून गेले. 

             रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आपल्या रक्तामुळे कुणाचे तरी प्राण वाचतात ही गोष्टच खूप मोठी आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी येऊन रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना भायखळा विधानसभेचे २१२ क्रमांक शाखेचे शाखा प्रमुख विनोद शिर्के यांनी केले आहे. रक्त दाता व्यक्तीला आकर्षक भेट वस्तू देण्यात येईल असे त्यांनी माहिती देताना सांगितले.

               रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला शाखा संघटिका सौ. सोनम सायगावकर, विकास झगडे, शाखा समन्वयक, तसेच विधान सभेचे सर्व महिला पुरुष पदाधिकारी व विषेश सह्यय डॉ प्रागजी वाजा यांनी केले आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी