
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तलाया तर्फे संडे स्ट्रीटचे आयोजन !!
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तलाया तर्फे संडे स्ट्रीटचे आयोजन !!
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना स्वस्थ राहण्यासाठी स्वतःला ही वेळ देणं मुश्किल होऊन बसत. पहाटे लवकर उठून आवरून ठरलेली ट्रेन पकडणं म्हणजे तारेवरची कसरतच. या धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना थोडा विरंगुळा मिळावा व तणावमुक्त वातावरणात जगता यावे म्हणून बृहन्मुंबई मा.पोलीस आयुक्तलया तर्फे संडे स्ट्रीट च आयोजन दिनांक १९ जून ०२२ रोजी सकाळी ७ ते १० वाजताच्या दरम्यान एन सी पी समोर मरीन ड्राइव्ह येथे राबवण्यात आले होते. कार्यक्रमा अंतर्गत लोकांनी तणाव मुक्त होऊन रस्त्यावर यावं हा या मागचा उद्देश होता ह्यावेळी विविध मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलींग, सांस्कृतिक खेळ या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात नागरिकांतर्फे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमात मा.दिलीप वळसे पाटील गृह मंत्री महाराष्ट्र राज्य, अभिनेता अक्षयकुमार तसेच मा. संजय पांडये पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व मा. विश्वास नांगरे पाटील पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई हे उपस्थित होते.