
मा. मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिली बेस्ट प्रवासासाठी सुवर्ण पर्वणी !
मा. मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिली बेस्ट प्रवासासाठी सुवर्ण पर्वणी !
दोन वर्षे करोना महामारीत सर्व शाळा, महाविद्यालय हे बंद होते, परंतु आता परिस्थिती नॉर्मल झाली आहे. शाळा कॉलेज पुन्हा आता सुरू झाली आहेत. मुंबईत बृहन्मुंबई महापालिकेच्या भरपूर शाळा आहेत. बृहन्मुंबई पालिकांच्या शाळेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन मुंबई महानगरपालिका सर्व शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देतात. विद्यार्थ्यांना फक्त शाळेत जावं लागत आणि आता मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना बेस्टद्वारे प्रवासासाठी स्मार्ट कार्ड तसेच मोबाईल अँपद्वारे मोफत प्रवासाची सुविधा बेस्ट उपक्रमात उपलब्ध करून दिली आहे.
खाजगी शाळेचे विद्यार्थी, कानिष्ठ महा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार वातानुकूलित बेस्टच्या प्रवासासाठी खास सवलतीच्या दरात इयत्ता ५ वी पर्यंत रु.२००/-, इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत रु.२५०/- , आणि इयत्ता ११ वी १२ वी ते पदवीका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता रु.३५० इतक्या सवलतीच्या दरामध्ये नवीन बस पास योजने अंतर्गत वातानुकूलित, विनावातानुकुलित, सुविधा बेस्ट उपक्रमाद्वारे देण्यात येत आहेत.
सदर सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाईन म्हणजेच अँपद्वारे देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बेस्ट आगरात येण्याची गरज भासणार नाही, ह्या योजनेची संपुर्ण माहिती बेस्ट उपक्रमाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी सदर सवलतीच्या बसपास योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.