
दोन दुर्दैवी घटना हायड्रा मशीन ची क्रेन व लिफ्ट तुटून इसमाचा मृत्यू !!
दोन दुर्दैवी घटना हायड्रा मशीन ची क्रेन व लिफ्ट तुटून इसमाचा मृत्यू !!
दिनांक 06/06/2022 रोजी दुपारी 04.45 वाजता चे सुमारास एस.बी.यु.टी. क्लस्टर 1, बोहरी मोहल्ला, भेंडी बाजार या ठिकाणी हायड्रा मशिनने क्रेनचा सुमारे 15 किलो वजनाचा लोखंडी मास्क उचलताना मास्कला ला बांधलेला सुती पट्टा निसटल्याने मास्कचा तोल गेल्याने त्याखाली काम करणारा इसम नामे किस्मत रिझाय्युल शेख, वय 25 वर्षे, रा.ठि. रामघाटी, मौजा गललचंदी अँश 113, कुरुननाहर लाभपुर पंचायत, पोस्ट तिबा, जि. बिरभूम, पश्चिम बंगाल याचेवर पडल्याने पाठीवर लागल्याने त्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास तात्काळ साबु सिद्दीकी मॅटरनिटी जनरल हॉस्पीटल, इमामवाडा रोड, मोगल मस्जीद मुंबई या ठिकाणी उपचारार्थ भरती केले असता त्यास सदर ठिकाणचे डॉक्टरांनी तपासणी करुन 6.15 वा. मयत घोषित केले. सदर बाबत अपमृत्यु नोंद क्रमांक 64/22 कलमह 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे नोंद करण्यात आली. गुन्हा नोंद करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
दिनांक 06/06/2022 रोजी दुपारी 02.00 वा च्या सुमारास एस बी यु टी, क्लस्टर 01, रौदत ताहिरा दर्गाच्या पुर्वेस, बोहरी मोहल्ला, भेडी बाजार, मुंबई येथे कंस्ट्रक्षनचे काम चालु असताना लिफ्टची तार तुटुन तेथे काम करणारे मजुर नामे सय्यदअली मोहम्मद अब्दुलहै विष्वरवी, वय 22 वर्शे व करीमुल उर्फ विपुल खान वय 22 वर्शे हे दोघे लिफ्टसह खाली पडले होते. सय्यदअली मोहम्मद याचेवर सर जे जे रुग्णालय, मुंबई येथे उपचार चालु असताना त्याचा दिनांक 06/06/2022 रोजी 21.00 वा मयत झाला आहे. सदर बाबत अपमृत्यु नोंद क्रमांक 65/22 कलम 174 सी आर पी सी अन्वय नोंद करून, गुन्हा नोंद करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.