
पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांची नो हॉन्कींग मोहीम !!
वाहनांसाठी आजकाल सर्व बॅंका अथवा फायन्यांसर हे इझी लोन देतात, त्यामुळे वाहन घेणं आता कॉमन झालं आहे. पूर्वी एखाद्याकडे वाहन असणं म्हणजे श्रीमंतीच लक्षण आणि प्रतिष्ठेचं समजलं जायचं. परंतु आता सामान्य माणूसही वाहन खरेदी करू शकतो आणि टू व्हीलर तर लहान प्रवासासाठी गरजेची होऊन बसली आहे. बस आणि ट्रेनचा प्रवास टाळण्यासाठी प्रचंड टू व्हीलर रस्त्यावर दिसतात. खाजगी चार चाकी वाहनांबरोबर ओला, टँक्सी, रिक्षा, ह्या वाहनांचा ही भडीमार झाला आहे. त्यामुळे प्रदुषण वाढत चालले आहे. वातावरण आणि ध्वनी प्रदूषण ही खूप वाढलंय विनाकारण गाडीचे हॉर्न वाजवणं त्यामुळे खूप त्रास होतो.
मुंबई शहरामध्ये वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे होणारी वाढती वाहतुकीची कोंडी लक्षात घेता मुंबई येथे ध्वनीप्रदुषणाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने, मा पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांनी मुंबई शहरामध्ये विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहनांवर # "NoHonkDay" या कायदा अनव्ये कारवाई करणे सूचित केले होते. या अनुषंगाने दैनंदिन कारवाई व्यतिरिक्त मुंबई शहरात दर बुधवारी विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहनांवर #NoHonkDay या अनव्ये कारवाई करणे नियोजित केले होते. म्हणूंन दिनांक ८ जून २२ रोजी अशा विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या तब्बल २५०० वाहनांवर कारवाई करण्यात आली.
याच बरोबर मोटार सायकल चालविताना सह प्रवासी Pillion Rider यास हेल्मेट बंधनकारक !
मुंबई शहरामध्ये मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ अनव्ये दुचाकी वाहनांचे चालक व सह प्रवासी (PillionRider) यांना शिरस्त्राण (Helmet) वापरणे बंधन कारक असताना देखील हेल्मेट वापरत नसल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने २५/५/०२२ च्या वार्तपत्रा द्वारे सूचित करण्यात आले होते व मोटारसायकलस्वारांना १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता.
तरीही मुंबईतील मुख्य रस्त्यावर प्रवास करताना मोटार सायकल वरून प्रवास करणाऱ्या चालकांना सूचित करण्यात येते की दिनांक २/६/०२२ रोजी पासुन मोटार सायकल वरून प्रवास करणारे चालक व सह प्रवासी यांना हेल्मेट घालणे बंधनकारक राहील. अन्यथा त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९, १९४ अनव्ये कारवाई करण्यात येणार आहे.