मुंबई पोलीस आयुक्तलयाच्या नवीन cp चेंबरचा उदघाटन सोहळा संपन्न !!

मुंबई पोलीस आयुक्तलयाच्या नवीन cp चेंबरचा उदघाटन सोहळा संपन्न !!

    दिनांक ६ जून २२ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र राज्यभिषेक सोहळ्याच अवचित साधून मुंबई पोलीस आयुक्तलयाच्या नवीन cp चेंबरचा, क्रोफर्ड मार्केट दुसरा माळा येथे मोठ्या दिमाखात  मुंबई प्रदेशचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त श्री सुरेश पांडे यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडला.

      चेंबर मध्ये नेचरल लुक असलेली पिवळ्या रंगाची देखणी आकर्षक विजेची झुंबर लावण्यात आली आहेत. ही नेचरल लाईट देणारी झुंबरे येथील खास वैशिष्ट्य आहेत असे श्री सुरेश पांडे बोलून गेले.

          कार्यक्रमा अंतर्गत मीडिया प्रतिनिधींना बोलवण्यात आले होते. कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पाडला, कार्यक्रमात चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. पत्रकारांच्या काही प्रश्नांचे ही ह्या वेळेस समाधान करण्यात आले.

          कार्यक्रमाच्या वेळी मुंबई सहआयुक्त (कायदा सुव्यवस्था) श्री विश्वास नांगरे पाटील व सोबत इतर पोलीस अधिकारीही उपस्थित होते.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी