गुरुकृपा हार्ट फाउंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वर्ल्ड हायपर टेंशन डे च्या निमित्ताने वाँकेथॉन चे आयोजन !!

गुरुकृपा हार्ट फाउंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वर्ल्ड हायपर टेंशन डे च्या निमित्ताने वाँकेथॉन चे आयोजन !!

        गुरूकृपा हार्ट फाउंडेशन व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, समाजिक कार्य, आरोग्य शैक्षणिक व क्षेत्रात १० वर्ष कार्यरत असलेले डॉ जी.पी. रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक १५ मे रोजी सकाळी ७ ते ८ ह्या वेळेत वर्ल्ड हायपर टेंशनच्या दिवसा निमित्त वाँकेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं. ह्या वाँकेथाँनचा उददेश समाजात व्यायाम व आरोग्य याबद्दल जनजागृती करणे हा होता. जेणे करून बदलत्या जिवनशैली मुळे व्यायामाच्या अभावी आरोग्य बिघडून रोगांना आमंत्रण दिले जाऊ नये. 

     आजच्या काळात हायपर टेंशन म्हणजेच उच्चरक्तदाब हा २५% वाढलेला दिसत आहे. शिवाय भारतात डायबेटीस म्हणजेच मधुमेहाचे प्रमाण ही खूप आहे. एकत्रित पणे उच्चरक्तदाब व मधुमेह भारतीयांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. आपण जर आपल्या जीवन शैलीत शिस्तबद्धता,व्यायाम आणि योग्य आहार ह्यांचा समावेश केला तर आपण ह्या रोगांपासून दूर राहून आरोग्य पूर्ण आयुष्य जगू शकतो. 

     हा संदेश देण्यासाठी खास वाँकेथाँन चे आयोजन करण्यात आले होते. हया प्रसंगी ३०० हुन अधिक डॉक्टरांनी गुरूकृपा हार्ट सेंटर अंधेरी पासून एम सी व्ही पी हॉल, आय एम ए हॉल जुहू पर्यंत अंदाजे दोन किलोमीटर अंतर पार केले.

      वाँकेथॉन नंतर हृदयरोग तज्ञांचे मार्गदर्शन एम सी व्ही पी हॉल जुहू येथे सम्पन्न झाले.

      चला पळा, आजार टाळा'

      सिगारेट, दारू सोडा

      आरोग्याशी नाते जोडा

      अशा अनेक घोषणा देत ह्या वाँकेथाँन ने  जनजागृतीचे कार्य केले. ह्या उपक्रमास डॉक्टर्स व सामान्य जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.

      डॉ. जी. पी. रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अनेक सामाजिक उपक्रम गुरुकृपा हार्ट फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्ट सातत्याने राबवत आहेत. गरीब विदयार्थींसाठी ६ रात्र पाळीच्या शाळा दत्तक घेतल्या आहेत. त्या शाळेतील विध्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा गेली सहा वर्षे ही संस्था करीतआहे. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांसाठी विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे.

      तसेच नियमित पणे आरोग्य शिबीर आयोजित करून जिथे तज्ञांचे मार्गदर्शन, परीक्षणे व चिकित्सा मोफत दिल्या जातात. तसेच वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यात गरजू रुग्णांना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला जातो. कोविड काळात गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत  गुरुकृपा  हार्टफाउंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केली आहे.

(सौजन्य :- केतन खेडेकर)


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week