
चेंबूर येथे बोलेरोने केला प्राणांकीत अपघात !!
दिनांक ११ एप्रिल ०२२ रोजी पाचच्या सुमारास फिर्यादी श्री शाहरुख अब्दुल जब्बार शेख, वय २३ वारस रा. अंजुमन स्कुल जवळ, गौतम नगर, पार्ट न.१,गोवंडी मुंबई हे होंडा अँक्टिव्हा क्र. एम एच ०१ सी एस ५३१७ ने त्याचे मित्र हुसेन उर्फ सोनू अली शेख वय २२ वर्ष यांच्या सोबत पूर्व द्रुतगती महामार्ग पोस्टल कॉलनी बसस्टॉप समोर मुंबई कडुन ठाणे कडुन जाणारी उत्तर वाहिनी चेंबूर या ठिकाणाहून जात असताना, पांढऱ्या रंगाचा बुलेरो पिकपच्या अज्ञात वाहन चालकाने निष्ककाळजी पणाने वाहन चालवून फिर्यादी यांच्या गाडीला पाठीमागून धडक देऊन फिर्यादी यांना जखमी करून त्यांचा मित्र हुसेन यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला.
तसेच पोलिसांना माहिती न देता व कोणतीही वैदयकीय मदत न देता निघून गेला. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि.क्र.२०१, कलम ३०४ अ ३३७, १३४ अ १३४ ब भारतीय दंड विधान अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.