
निर्मल नगर मुंबई पोलीस ठाण्यात दुसऱ्या माळ्याचा उदघाटन समारंभ संपन्न !!
निर्मल नगर मुंबई पोलीस ठाण्यात दुसऱ्या माळ्याचा उदघाटन समारंभ संपन्न !!
दिनांक २३ मार्च ०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता निर्मल नगर पोलीस ठाणे येथे दुसऱ्या माळ्याचा उदघाटन समारंभ सोहळा पार पडला. पोलीस ठाण्यात कामाची वाढलेली गर्दी लक्षात घेता पोलीस ठाण्यावर दुसऱ्या माळ्याचे बांधकाम करण्यात आले. दुसऱ्या माळ्याचे उदघाटन श्री संजय पांडे पोलीस आयुक्त मुंबई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
दुसऱ्या माळ्याचे बांधकाम ४,५०० स्क्वेर फिट एकूण ११ रुम, एक हॉल, टॉयलेट, बाथरूम हे REDAI/MCHI यांच्या सहाय्याने CSR फंडातून पूर्ण करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाच्या वेळी श्री विश्वास नांगरे पाटील पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई, श्री संदिप कर्णिक अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मुंबई, डॉ. डी. एस स्वामी पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०८ मुंबई, श्री मंजूनाथ शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ मुंबई, श्री कैलास आव्हाड सहाय्यक पोलीस आयुक्त खेरवाडी विभाग मुंबई तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच CREDEAI/MCHI चे अध्यक्ष श्री बोमन इराणी, डॉ. माणिक रोमल, पार्थ महेता व इतर सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले.