
बॅटरी स्वॅपिंग’ हा एक व्यावहारिक पर्याय होऊ शकतो !!
“वाहन उद्योगात शाश्वतता आणण्याच्या उद्देशाने माननीय अर्थमंत्र्यांनी २०२२-२३च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या आराखड्यामुळे भारतात विद्युत वाहनांच्या स्वीकृततेला चालना मिळणार आहे. ‘बॅटरी स्वॅपिंग’ हा एक व्यावहारिक पर्याय होऊ शकतो आणि त्यातून विद्युत वाहनांचा वापर वाढण्यात मदत होईल. अखेरच्या टप्प्यापर्यंत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्याच्या दृष्टीने, ‘बॅटरी स्वॅपिंग’चे धोरण आखण्यात व ते अमलात आणण्यात आम्ही सरकार, धोरणकर्ते आणि आमचे भागीदार यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. यामध्ये आंतरकार्यान्वयीन मानके सादर करणे; तसेच सेवा व्यवसायाचे मॉडेल म्हणून बॅटरीमध्ये नाविन्यपूर्णतेस चालना देणे यांचा समावेश असेल.” – राजेश जेजुरीकर, कार्यकारी संचालक, ऑटो अँड फार्म सेक्टर, महिंद्रा अँड महिंद्रा लि.