शिवसेनेच्या वत्सलाताई, आमदार सुनील शिंदे !!

       या आहेत पूनावाला चाळ क्र. १, लोअर परळ येथील ८० वर्षीय जेष्ठ शिवसैनिक वत्सला वसंत सावंत अगदी दोन दिवसापूर्वी विकासकामाच्या शुभारंभानिमित्त त्यांच्या चाळीत गेलो होतो तेव्हा त्यांना भेटलो व त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवसेनेच्या माध्यमातून व नामदार मा. आदित्यजी ठाकरे यांच्या निधीतून विकासकामाचा शुभारंभ होणार आहेत हे समजताच त्या स्वतः चाळीखाली आल्या, मला त्यांनी अत्यानंदाने कडकडून मिठी मारली. वत्सलाताई या बहीणाबाईंसारख्या शीघ्रकवी, त्यांनी माझ्यावर on the spot गाणे तयार करून आपल्या खणखणीत आवाजात सादर केले व माझे अभिनंदन केले. वयाच्या ८०व्या वर्षीही त्यांचा उत्साह एकाद्या तरुणालाही लाजवेल इतका सळसळता व दांडगा आहे. त्याकाळातील वत्सलाताईंसारखे निष्ठावंत शिवसैनिक हेच तर शिवसेनेच्या अभेद्य किल्याचे भक्कम चिरे आहेत. 

       शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे १९६८ पासून वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन वत्सलाताईंसारख्या अनेक रणरागिणींनी महिला आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या प्रचार आणि प्रसारात स्वतःला झोकून दिले व त्याबदल्यात कधीही कसलीही अपेक्षा केली नाही. शिवसेनाप्रमुखांचा आदेश म्हणजे शिरसावंद्य मानत त्यांनी निरपेक्ष वृत्तीने केलेल्या कामांमुळे, संपर्कामुळे, निवडणुकीतील प्रचारामुळे विभागातील शिवसेनेची पाळेमुळे अधिक भक्कम झाली व त्यांची फळे आज आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना चाखायला मिळत आहेत.

        वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झालेल्या वत्सलाताईंसारखे शिवसैनिक हेच खरे शिवसेनेचे भांडवल आहे. शिवसेनेकडून कधीही कोणतीच अपेक्षा न करता शिवसेनेचा भगवा अखंड फडकवत ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. आजच्या शिवसैनिकांनी हा वसा पुढे सुरु ठेवला पाहिजे. 

       मा. वत्सलाताईंना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या सारख्या जेष्ठ शिवसैनिकांचे मार्गदर्शन व आशीर्वाद आम्हांला सातत्याने मिळत राहो हीच आईतुळजाभवानी चरणी प्रार्थना !

         *आमदार सुनिल शिंदे*

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ, मुंबई


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week