विधान परिषदेचे आमदार श्री. सुनील शिंदे यांचा, विधान परिषदेत विधान परिषद सदस्य म्हणून शपथ ग्रहण !
वरळी विधान सभेचे माजी कार्य सम्राट आमदार श्री. सुनील शिंदे हे वरळी विधानसभेतील कार्य सम्राट आमदार म्हणून खूप लोकप्रिय आहेत. शाखा प्रमुख पासून ते वरळी विधान सभेचे आमदार म्हणून त्यांचे कार्य वाखाणण्या जोगे आहे. शाखेत असो वा ऑफिस मध्ये भेटण्यासाठी सामान्य माणसाला ही वेळेचे बंधन नसते. कधी शिंदे नगरसेवक, आमदार असताना सन् मिल गल्लीत रात्रीचे दीड च्या सुमारासही लोकांचे प्रश्न सोडवताना लोकांनी पाहिलेले आहे.
वरळी विधान सभेचे माजी कार्यसम्राट आमदार श्री सुनील शिंदे यांची मुंबई विधान परिषद मधुन पुन्हा एकमताने आमदार म्हणून निवड झाली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाने, आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून शपथ ग्रहण केली.
आता वरळी सारख पूर्ण मुंबईसाठी पण काम करू असे उदगार ह्या वेळी शिंदे यांनी काढले.
अश्या कर्तव्य दक्ष कार्य सम्राट नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांना बातमीकार ऑनलाइन वृत्तपत्र व रूपेरी वरळी ह्यांचे संपादक श्री. अभिषेक शिंदे, क्राईम रिपोर्टर प्रीती तिवारी व एडिटोरील टीम बातमीकार व रुपेरी वरळी कडून जोरदार अभिनंदन व पुढच्या सामाजिक कार्यासाठी भरभरून शुभेच्छा.