न्यू आधार फाउंडेशन मुंबई तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर !!

न्यू आधार फाउंडेशन मुंबई तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर !!

     भारतीय जनता पार्टी वरळी विधान सभा, तसेच न्यू फाउंडेशन मुंबई तर्फे येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागता प्रित्यर्थ, दिनांक 26 डिसेंबर रोजी वरळी पोलीस कॅप वरळी मुंबई येथे इतर मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात मधुमेह तपासणी शिबीर, रक्त दाब, आणि इतर आजारांवर मोफत चिकित्सा करून औषध ही देण्यात आली. 

        ह्या कार्यक्रमाचे अवचित साधून मा. प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचा मन की बात, तसेच महिलांसाठी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या वेळी दक्षिण मुंबई भापजचे जिल्हा महामंत्री दिपक सावंत, वरळी विधान अध्यक्ष दिपक पाटील, गणेश नागरे, विनोद राय, वार्ड 196 चे अध्यक्ष जितेंद्र झा तसेच महिला पदाधिकारी उज्वला सावंत तसेच वैशाली देवरुखकार, ज्योती झा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

       कार्यक्रमा अंतर्गत वरळी विधान सभा उपाध्यक्ष, बातमीकार वृत्त पत्राच्या क्राईम रिपोटर 'प्रीती तिवारी' यांची विशेष उपस्थिती होती, भाजपच्या कार्यकर्त्या व मराठा संघ मुंबई यांच्या अध्यक्षा उज्वला सावंत यांच्या हस्ते प्रीती तिवारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा अंतर्गत कवी नंदेय महेश भामरे तसेच प्रहार चित्रपट संघटनेचे सचिव अमित मुळे ही उपस्थितीत होते, प्रीती तिवारी व कवी नंदेय यांनी खास स्त्रियांवर आधारीत कविता सादर केल्या.

       कार्यक्रमासाठी आमदार आशिष शेलार व दक्षिण मुंबईचे भाजपा अध्यक्ष शरद चिंदनकर यांनी ही हजेरी लावली, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला 100 महिला उपस्थित होत्या तसेच इतर महिला व पुरुष कार्यकर्त्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यास खूप मदत केली. आरोग्य शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week