
वसईत गुलाबी थंडीला सुरवात !!
नोव्हेंबर उगवला म्हणजे थंडीची चाहूल लागते, दिवाळीच्या सुट्टीत गुलाबी थंडीचा आंनद घेण्यासाठी लोक माथेरान, महाबळेश्वर येथे जातात. बिलकुल तशीच गुलाबी थंडीची सुरवात वसई तालुक्यात सुरू झाली आहे. दिवसभर वातावरण थंड असते. रात्री अगदी पांघरून ओढवी इतकी थंडी लागते. पहाटे ते सकाळ पर्यंत अगदी सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते.वातावरण अगदी आल्हाद दायक झालेलं आहे. येथील रहिवासी सकाळी, सकाळी मस्त धुक्यातून फिरत गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.