
पारंबी प्रॉडक्शन प्रस्तुत पहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२१ नुकताच दादर येथे सम्पन्न !!
पारंबी प्रॉडक्शन प्रस्तुत पहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२१ नुकताच दादर येथे सम्पन्न !!
पारंबी प्रॉडक्शन प्रस्तुत पहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२१ नुकताच दादर येथील गुरुकुल स्टुडिओ सभागृहात पार पडला. पहिलेच वर्ष असलेल्या या महोत्सवाला रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.
पारंबी प्रॉडक्शन चे प्रमुख अक्षय वास्कर यांचे लघुचित्रपट महोत्सव आयोजित करण्याचे प्रयोजन मूलतः नाविन्यपूर्ण आणि समाजप्रबोधन करण्याऱ्या फिल्ममेकर्सना प्रोत्साहन मिळावं आणि त्याच्या कल्पनेशक्तीचा विकास व्हावा आणि चांगली संधी उपलब्ध व्हावी यासाठी होता. या आधीही पारंबी प्रॉडक्शनने आयोजित केलेल्या फोटोजनिक फेस स्पर्धेत आणि एकपात्री अभिनय स्पर्धेतही तरुण तसेच ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला होता.
या महोत्सवात देशपरदेशातून तब्बल २०३ लघुपटांचा समावेश करण्यात आला होता. त्यात विशेषतः युनायटेड स्टेट्स, इटली, पोर्तुगाल, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, मोरोक्को, युनायटेड किंगडम, स्पेन, ब्राझील, फ्रान्स, पेरू, युनायटेड अरब इमारत्स, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, बांगलादेश, पोलंड, कॅनडा, माल्टा, जर्मनी, डेन्मार्क, क्रोएशिया, सिरियन अरब रिपब्लिक, व्हेनेझुएला बोलिवेरियन, फिलिपिन्स अशा भारतासह परदेशातूनही बऱ्याच लघुपटांचा समावेश होता. या सर्व लघुपटांच प्रदर्शन कोविड निर्बंधांमुळे ऑनलाइन माध्यमातून पारंबी प्रॉडक्शन च्या युट्युब चॅनेल वर करण्यात आले होते.
सर्व चित्रपटांना मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहून आणि कोविड चे नियम पाळून बक्षिस वितरण समारंभ रसिक प्रेक्षकांसाठी सभागृहात भरवण्यात आला.
या लघुपट महोत्सवाला सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, तसेच अभिनेत्री संजीवनी पाटील आणि अभिनेते अनुज ठाकरे अशा दिग्गज कलाकारांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
लघुचित्रपटांचे प्राथमिक फेरीचे परीक्षण लेखक, दिग्दर्शक अमोल पाडावे, लेखक, दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे आणि लेखक, दिग्दर्शक विवेक कदम या मान्यवरांनी केले तसेच अंतिम परीक्षण राष्ट्रीय पुरस्कृत विजेते दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे आणि चित्रपट समिक्षक डॉ. संतोष पाठारे यांनी केले.
या लघुपट महोत्सवाचे आयोजन पारंबी प्रॉडक्शन चे प्रमुख अभिनेते, दिग्दर्शक अक्षय प्रकाश वास्कर तसेच सिनेमॅटोग्राफर सागर सुरळकर आणि संपूर्ण टीम यांनी केले होते.
या महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचे प्रथम पारितोषिक सुमित पाटील दिग्दर्शित 'लाल' या लघुपटाला मिळाले त्याचप्रमाणे दुसऱ्या पारितोषिकाचा मान मनोज नाईकसाटम दिग्दर्शित 'वारसा' आणि तिसऱ्या पारितोषिकाचा मान शिबु साबळे दिग्दर्शित 'मोन्या' या लघुपटाला मिळाला.
विशेष ज्युरी पुरस्कार दोन 'जगातील कवी' या लघुपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुमित पाटील (लाल), सर्वोत्कृष्ट लेखक भारत शिरसाट (घरा घरात छत्रपती शिवाजी महाराज??), सर्वोत्कृष्ट पटकथा सुमित पाटील आणि अनुराग जाधव (लाल), सर्वोत्कृष्ट संवाद बालाजी सुतार, स्वप्नील कापुरे, गोपाल तिवारी (दोन जगातील कवी), सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार जुड एला (आय एम कन्नंगी- ऑस्ट्रेलिया) या लघुपटांना गौरविण्यात आले.
तसेच सर्वोत्कृष्ट संकलन म्हणून मोगरा (रोहित घोक्षे, मयूर धामापूरकर), सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी संगीत मोन्या (अनुराग गोडबोले), सर्वोत्कृष्ट अभिनेता मिष्टी डोई (मिलिंद उके), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री धडा (गौरी कोंगे), सर्वोत्कृष्ट बालकलाकार मोगरा (संजय निषाद) या कलाकारांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट लॉकडाऊन चित्रपटाचा मान 'फक्त 144' या लघुपटाला मिळाला तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपट म्हणून 'प्रिय कान्हा' आणि पारंबी चॉईस पुरस्कार 'मोगरा' या चित्रपटाला मिळाला.
विशेष पुरस्कार म्हणून सर्वोत्कृष्ट पोस्टर पब्लिक चॉईस पुरस्कार 'धडा - द लेसन' या लघुपटाला मिळाला तसेच सर्वोत्कृष्ट कोविड योद्धा लघुपट 'शरपंजरी' ला मिळाला.
ज्युरी विशेष उल्लेखनिय पुरस्कार म्हणून घरा घरात छत्रपती शिवाजी महाराज ??, आइचा (मोरोक्को), शेड, मोगरा या लघुपटांना देण्यात आला.
पारंबी विशेष उल्लेख पुरस्कार विभागातून सर्वोत्कृष्ट बाल अभिनेत्री श..शाळेचा (अंकिता ढोकळे), सर्वोत्कृष्ट संकलन- लाल (सौरभ नाईक) ला देण्यात आले.
पारंबी विशेष उल्लेख पुरस्कार या विभागातून पार्क लाइफ (बायरन सील) (दक्षिण आफ्रिका), आय एम कन्नंगी (झॅनी बेग(ऑस्ट्रेलिया), परिस (मुकुंद खुपरकर), बधाई (आशुतोष सिंग), उकल (चेतन किंजलकर), चह्ऱाट (दिवाकर मोहिते), कॅफेपासची चिमुरडी (शौनक जोशी), मुस्कान (विख्यात श्रीवात्सव) या लघुपटांना देण्यात आले.
या लघुपट महोत्सवाचे निवेदन प्रज्ञा बारगोडे-वाघरे यांनी केले होते तसेच ग्राफिक डिझाईन ऋजुता लाखे यांनी केले होते.