मा. राज्यपाल यांच्या आदेशाने उपमुख्य अधिकारी ( म्हाडा) बदलीचे आदेश देऊन सुध्दा म्हाडा प्राधिकरण यांनी संबंधितांना सध्याच्या पदस्थानावरून कार्यमुक्त केलेले नाही !!

मा. राज्यपाल यांच्या आदेशाने उपमुख्य अधिकारी ( म्हाडा) बदलीचे आदेश देऊन सुध्दा म्हाडा प्राधिकरण यांनी संबंधितांना सध्याच्या पदस्थानावरून कार्यमुक्त केलेले नाही !!

     (वार्ताहर - अभिजीत पेठे) मुंबई बेटावरील मोडकळीस आलेल्या जुन्या उपकरप्राप्त इमारती असलेल्या इमारती धोकादायक झाल्यानंतर ताप्तपुरते स्थलांतर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरर्चना मंडळ याच्याकडील संक्रमण- शिबीर मध्ये करण्यात येते. अनेक वर्षे संक्रमण शिबीर मध्ये रहिल्यानंतर त्यांची मुळ इमारत काही कारणास पुनरर्चित न झाल्यास त्यांना पुनरर्चित / पुनर्विकसित इमारतीत मंडळाच्या बृहतसूची विभागामार्फत मुळ भाडेकरू यांची पात्रता निश्चित करून सदनिकेचे वितरण केले जाते. परंतु सन 2018 मध्ये तात्कालीन  सहमुख अधिकारी/इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळे मुंबई यांनी बृहत्तसूचीवरून 95 भा/ र यांच्या पात्रता यादीमध्ये झालेल्या अफरातफरी मध्ये वितरणाची यादी रद्द करून तात्कालीन सहमुख्य अधिकारी दु / पु. यांची  तडकाफडकी बदली करून त्यांना मुळ  ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात आले.  तात्कालीन उपाध्यक्ष/ प्रा. यांनी वितरणास स्थगिती देण्यात आली. पुन्हा  95 पात्र भा/ र यांची सुनवाई घेण्यात यावी. तोपर्यंत विताणावर स्थगिती देण्यात यावे असे आदेश पारित करण्यात आले होते. त्यामुळे वितरणाची कार्यवाही बंद करण्यात आली. तसेच भारत देशात आलेल्या कोविड-2019 महामारीमुळे वितरणाची  कार्यवाही बंद होती. सदर बृहतसूचीवरून वितरणाची कार्यवाही चालू झाल्यानंतर मा. मंत्री महोदय गृहनिर्माण विभाग यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळा मार्फत बृहतसूची वरील  गाळ्याच्या वितरण प्रक्रियेत दि. 02 जुलै 2021 रोजी पत्रान्वये स्थगिती देण्यात आली. परंतू स्थगिती असताना देखील खास मर्जीतील लोकांना सदनिका वितरण केल्याचे दिसून येते.

       वितरण संबंधित विचारणा केली असता अधिकारी उत्तर देण्यास तयार नाहीत, तंदनतर मा. मंत्री महोदय यांनी दि. 9 सप्टेबर 2021 रोजी देण्यात आलेली स्थगिती निष्कासीत केली. बृहतसूचीवर पात्र भा/ र वितरण करण्यात आलेल्या सदनिका ताबा घेण्यास पु.गा कार्यालयात गेले असता, कार्यालयाचे संबंधित अधिकारीही यांच्याकडे वितरण/ ताबा प्रक्रियेची विचारणा केली असता. उपमुख्य अधिकारी (पु . गा) अधिकारी यांची बदली कोकण मंडळ (म्हाडा घटक) येथे झाली असल्याने त्यांच्या जागेवर नविन अधिकारी आले नाहीत. नविन अधिकारी येतील तेव्हा पात्र भा/ र यांच्या नस्तीवर वितरणाचे व ताबा प्रक्रिया करण्यात येतील असे सांगण्यात येते. म्हाडातील उपमुख्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या दि 3 सप्टेबर 2021 रोजी मा. राज्यपाल यांच्या मान्यतेने करण्यात आल्या होत्या. तथापि म्हाडा/ प्रा यांच्याकडून संबंधित उपमुख्य अधिकारी यांना सध्याच्या पदावरून कार्यमुक्त केलेच नसल्याचे दिसून येते. याबाबत मा. मुख्यमंत्री व गृहनिर्माण विभाग कार्यालयाकडून संबंधितांना  तात्काळ कार्यमुक्त करुन बदली नंतरची पदस्थान  कार्यभार स्विकारण्याचे संबंधिताना आदेश देण्यात यावे. त्यामुळे सर्व- सामान्य लोकांची  अडकलेली कामे जलदगतीने मार्गी लागतील असे काही मूळ भाडेकरूंनी सांगितले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week